सावरकरांवरुन राजकारण तापलं; ठाकरेंकडून काँग्रेसच्या ‘डिनर’वर बहिष्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Congress leader Rahul Gandhi and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will meet matoshree
Congress leader Rahul Gandhi and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will meet matoshree
social share
google news

Rahul Gandhi News :

ADVERTISEMENT

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांना यावरुन जाहीरपणे सुनावल्यानंतर आता ठाकरेंनी काँग्रेसच्या डिनरवर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना (UBT) चा कोणताही नेता काँग्रेसच्या या डिनरला जाणार नसल्याची माहिती, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray boycotted the Congress dinner)

आज (सोमवार) रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी त्यांच्या घरी डिनरचे आयोजन केलं आहे. मात्र शिवसेनेने यांचं डिनरवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर असहमत असल्यामुळे शिवसेना (UBT) खासदार या डिनरला उपस्थित राहणार नाहीत.

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?

काय म्हणाले होते राहुल गांधी?

लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान एका पत्रकाराने राहुल गांधी यांंना प्रश्न विचारला की, जेव्हा हे लोक ‘माफी मागा’ म्हणतात तेव्हा राहुल गांधींना काय वाटते? यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray : सावरकरांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?

राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक होत वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करू नका, असा इशारा दिला. सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी केली तेव्हापासून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यांवरुन जाहीरपणे सुनावलं. राहुल गांधींंना माझं एक सांगणं आहे, सावरकर आमचं दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सोबत लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं ते येऱ्या गबाळ्याच काम नाही. या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याला फाटे फोडू नका. अन्यथा आपला देश हुकुमशाहीकडे गेलाच म्हणून समजा, असं ठाकरे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray : “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर घणाघाती टीका

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT