CM Eknath Shinde : शरद पवार, अरविंद सावंत अन् रिक्षावाला; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून बोललेल्या रिक्षावाला शब्दामुळे वादात सापडले आहेत.
ADVERTISEMENT
MP Arvind Sawant Vs Chief Minister Eknath Shinde
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) हे सध्या एका शब्दामुळे वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) स्थापन होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP) यांनी दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का? असा प्रश्न विचारल्याचा गौप्यस्फोट सावंतांनी केला. याच विधानातील ‘रिक्षावाला’ या शब्दावरुन त्यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. यावरुन वाद होताच त्यांनी यु-टर्न घेत हा पवारांचा नव्हता तर आपला शब्द असल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र अद्याप हा वाद शमताना दिसतं नाही. सावंत यांच्याविरोधात राज्याच्या विविध ठिकाणी रिक्षावाला संघटनांनी आंदोलन केलं. तसंच भाजपनंही यावरुन सावंत यांना प्रत्युत्तर दिलं. (Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant in a controversy over his rickshaw-walla remark addressed to Chief Minister Eknath Shinde.)
नेमका काय झाला वाद?
काय म्हणाले होते अरविंद सावंत?
महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा शरद पवार म्हणाले, आमच्या काँग्रेसमध् दोन दोन मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज आहेत. छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? तरीही उद्धवजींनी नाव दिलं होतं. पण नाही. मग शरद पवार यांनीच गळ घातली, उद्धवजी हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
हे वाचलं का?
हेही वाचा : धाराशीवमध्ये मविआ अन् भाजपचा करेक्ट कार्यक्रम; CM शिंदेंनी ठाण्यात बसून दिला धक्का
या वक्तव्यावरुन वाद होताच सावंत यांनी यु-टर्नही घेतला :
आदरणीय शरद पवार यांनी सांगितलं तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल, तरचं हा गाडा चालेल. मग आम्ही रणांगणातून पळणारे नाही. त्यामुळे त्यांनी ती स्विकारली. ते खुर्चीसाठी महाविकास आघाडीसोबत गेले हा आरोप खोटा आहे. या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? हा माझ्या भाषणातून ओघाने आलेला शब्द आहे. तो त्यांच्या वक्तव्यातील शब्द नाही. मी स्विकारतो हा माझा शब्द आहे. हा पेशाचा विषय नाही, अनुभवाचा विषय आहे. आजही वाचू का करतात, आजही माईक खेचला जातो. म्हणजे कळतं ना? तेवढं नेतृत्व प्रगल्भ लागतं.
अजित पवार यांनी काय दिलं स्पष्टीकरण?
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आमचं घराणं अतिशय कष्ट घेऊन पुढे आलेलं आहे. शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वांचा आदर केला आहे. तसंच अरविंद सावंतांनी स्पष्ट केलं आहे की, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Rahul Gandhi यांना पुन्हा खासदार होण्यासाठी काय आहेत पर्याय?
भाजपने काय दिली प्रतिक्रिया?
हे गंभीर वक्तव्य आहे, हा श्रमशक्तीचा अपमान आहे. रिक्षावाला राज्य चालवू शकत नाहीत का? किती प्रभावीपणे ते राज्य चालवत आहेत. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. सामान्य घरातील माणसं राज्य चालवतात, हे शरद पवार यांना सहन होतं नाही, हे मी वारंवार सांगत असतो, अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT