‘बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात उद्धव ठाकरे त्यांना…’, नितेश राणेंचा खळबळ उडवणारा राजकीय बॉम्ब

मुंबई तक

ADVERTISEMENT

After Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis, BJP MLA Nitesh Rane also criticized Thackeray. This time he has made very serious allegations.
After Uddhav Thackeray criticized Devendra Fadnavis, BJP MLA Nitesh Rane also criticized Thackeray. This time he has made very serious allegations.
social share
google news

Maharashtra Politics Update Today: सिंधुदुर्ग: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूरवर कलंक आहेत अशी टीका केल्यानंतर अवघी भाजप (BJP) त्यांच्यावर आता तुटून पडली आहे. अशावेळी आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तर उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. (shiv sena ubt uddhav thackeray criticized devendra fadnavis bjp mla nitesh rane criticized thackeray made very serious allegations latest political news maharashtra)

दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी असाही आरोप केला आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रचंड त्रास दिला. त्यांना योग्य वेळी औषधं दिली नाही, त्यांना योग्य वेळी खाणं दिलं नाही.. एवढंच नाही तर ते बाळासाहेबांचा म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन ते हाक मारायचे. असं अत्यंत खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केले आहेत.

पत्रकार परिषदेत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर तुफान टीका

‘आमचे लगेच संस्कार काढले जातात, पण त्यांचे…’

‘उद्धव ठाकरे हा व्यक्ती अतिशय सुसंस्कृत वाटतो. फार सहानभूती त्याला मिळते. फार कुटुंबवत्सल अशी प्रतिमा त्यांनी लोकांच्या समोर त्यांनी तयार केली आहे. त्याने काही बोललं, कोणावर कितीही वैयक्तिक टीका केली.. कोणाच्या कुटुंबाबत कितीही खालच्या पातळीवर बोलला तरीही कधीही पत्रकारांना त्याची जीभ घसरलेली दिसत नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> MLA: सत्तेत सहभागी झाले तरी नरहरी झिरवळ म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार अपात्र होणार!’

‘पण दुसऱ्या बाजूला आमच्या कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणं.. त्यांच्या शरीरावर बोलणं, कुटुंबीयांवर बोलणं.. त्यांना नावं ठेवणं या काही गोष्टी केल्या.. आणि आम्ही त्याच्यावर टीका केली की, लगेच आमचे संस्कार काढले जातात. आमची जीभ घसरते..’ असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

‘बाळासाहेबांना म्हातारा हाक मारायचा…’

‘पण आतापर्यंत उद्धव ठाकरेसारखा बेशरम माणूस ज्याने स्वत:च्या भावाला ज्याने मोजलं नाही.. स्वत:च्या वडिलांना त्यांच्या आजारपणात त्रास दिला.. याच उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांच्या शेवटच्या महिन्यांमध्ये.. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हातारा म्हणून उल्लेख करायचे.. याच उद्धव ठाकरेचं कुटुंब ज्या माननीय बाळासाहेबांच्या नावाने वचनं देतायेत.. त्याच बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन ते हाक मारायचे. हे मी रामेश्वरची शपथ घेऊन सांगतोय.’ असा अत्यंत खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी तुला रक्ताच्या भावापेक्षाही जास्त सांभाळलं!

‘मोठ्या शपथा घेऊन स्वत:ला खरं ठरविण्याचा जो काही सपाटा सुरू केला आहे.. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुझ्या रक्ताच्या भावापेक्षाही जास्त सांभाळलं.. तुझे लाड सहन केले.. तू आज ज्या मातोश्री 2 मध्ये तुझ्या कुटुंबीयांबरोबर लपून राहतोय. त्याच्या परवानग्या कोणी दिल्या?’

ADVERTISEMENT

‘जो महापौरांचा बंगला जो तुम्ही लोकांनी बळकवला. बाळासाहेबांच्या नावाने.. त्याच्या परवानग्या कोणी आणून दिल्या.. 2014 ते 2019 मध्ये तुझे लाड जे फडणवीस साहेबांनी पुरवले, तुला सांभाळलं.. अरे तुझा रक्ताचा भाऊ तुझ्याबद्दल काय बोलतो.. तू त्याची काय अवस्था केली आहेस.. आम्हाला तोंड उघडायला लावलं तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल.’ अशी टीकाही नितेश राणेंनी यावेळी केली.

‘तू बाळासाहेबांना खायला देखील दिलं नाही..’

‘ज्या बाळासाहेबांबद्दल तू बोलतोस. त्याच बाळासाहेबांना तू औषधं पण वेळेवर द्यायचा नाही, त्यांना खायला वेळेवर द्यायचा नाहीस.. अशा नीच प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्यांना नावं ठेवतो. दुसऱ्यांना कलंक बोलतो. अरे तू तर मर्दांगीवर कलंक आहेस. तू किती मर्द आहेस हे जरा तुझ्या घरातल्यांना विचार ते तुला सांगतील. बाळासाहेबांच्या भाषेत काँग्रेसबरोबर जाणारे लोकं हि#%.. आणि तू काल त्या हि%#%# प्रमुख बनून जे काही भाषण करतोयस.’ अशी विधानं देखील यावेळी नितेश राणेंनी केली आहेत.

आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप..

‘अरे तुझा तो कार्टा मुलगा.. ठाकरे नावावर कलंक आहे. त्या दिशा सालियनला कसं मारलं? आज मी महाराष्ट्राला मुद्दामून सांगीन.. हा फक्त दिशा सालियान या विषयामुळे घाबरत नाहीए. पण त्या आठ जूनला त्या पांचोलीच्या घरी लहान मुलं का आणलेली? याचंही उत्तर आदित्य ठाकरेने आम्हाला द्यावं. लहान मुलं आणि आदित्य ठाकरेंचं काय संबंध आहे. कुठल्या एनजीओच्या माध्यमातून ती लहान मुलं तिथे आणलेली? हा ठाकरे.. जे नाव बाळासाहेबांनी कमावलेलं. त्याला कलंक लावण्याचं काम आदित्य ठाकरेनं केलं आहे. हा तुझा थयथयाट आहे.’

हे ही वाचा>> शिंदे, फडणवीस, पवारांमध्ये खलबतं! रात्री 2 वाजेपर्यंत बैठक कशासाठी?

‘फडणवीसांना नावं ठेवतोय त्याचं कारण हेच आहे की, आदित्य ठाकरे हा जेलमध्ये जाणार आहे. सगळे पुरावे.. तुझ्या कार्ट्यापर्यंत येऊन पोहचतायेत आणि हे तुला माहिती आहे. की तुझा आदू बाळ लवकर आर्थर जेलमध्ये जाणार आहे. आमच्या फडणवीस साहेबांवर कुठल्याही खालच्या पातळीची टीका केली तर तुझ्या मुलाचे कसे कपडे फाडायचे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे.’

’39 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आहोत. तुम्ही कसं फुकटचं खाता.. तुमच्या मातोश्रीमध्ये काय-काय घाणेरडे कृत्य होतात.. तुम्ही बाळासाहेबांना शेवटच्या दिवशी कसा त्रास दिला आम्ही पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर आणू.’ अशी टीकेची झोडच नितेश राणेंनी ठाकरेंवर उठवली.

‘मुख्यमंत्री पदाचं स्वप्न याच्या बायकोचं होतं, ते त्याने पूर्ण केलं’

‘अमित शाह साहेबांच्या शब्दांवर देशाला आणि महाराष्ट्राला जास्त विश्वास आहे. त्या माणसाने दिलेला शब्द पाळला आहे. पण हा उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती ना कधी बाळासाहेबांचा झाला.. ना महाराष्ट्राचा झाला.. याचं 1999 पासून ते आतापर्यंत मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न होतं. म्हणून याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी.. याला बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं. याला याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचं होतं मुख्यमंत्री बनून. 1999 पासून ते आतापर्यंत त्याची बायको स्वप्न बघत होती.’ असं विधान देखील नितेश राणेंनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT