CM शिंदेंच्या आमदाराने भाजप आमदाराला सुनावलं, ”मराठीचा अपमान….”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shivena mla pratap sarnaik criticize mla geeta jain on theater viral video
shivena mla pratap sarnaik criticize mla geeta jain on theater viral video
social share
google news

मिरा भाईंदर महापालिकेच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी महापालिकेचा अभियंता शुभम पाटीलला कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर आता गीता जैन यांचा थिएटरच्या मॅनेजरसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेवर आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आक्षेप नोंदवला आहे.आमदार गीता जैन यांच्याकडून मराठीचा सतत अपमान होत आहे, हे सहन केले जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. (shivena mla pratap sarnaik criticize mla geeta jain on theater viral video)

ADVERTISEMENT

मिरा भाईंदरमधील एका थिएटरमध्ये गीता जैन यांनी मॅनेजरसोबत वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कार्यक्रमाच्या वेळेवरून गीता जैन यांनी मॅनेजरला फटकारले होते. या दरम्यान मॅनेजर त्यांची माफी देखील मागितली होती. याच घटनेवर आता प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी होत असेल आणि मराठी नाटकाचे प्रयोग बंद होत असतील तरी ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच मी आमदाराआधी मी मराठी आहे. मला सुद्धा या शहराचे नेतृत्व करत असताना, माझ्या भाषा, जाती, धर्माबंदद्ल अभिमान आहे. पण मराठीचा सतत अपमान होत आहे, हे सहन केले जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.शेवटी लोकप्रतिनीधी हा कोणत्या जाती, धर्माचा, पंताचा नसतो, पण पर्वाची जी घटना घडली ती माणूस म्हणून वेदना देणारी आहे,असे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Sana Khan: नागपूरमधील भाजप महिला नेता बेपत्ता, हत्या झाल्याचा संशय

प्रताप सरनाईक यांच्या या टीकेवर आता गिता जैन यांची प्रतिक्रिया दिली आहे. जर चालू असलेला कार्यक्रम नंतर असता आणि मराठी माणसाला बाहेरही उभं राहावं लागलं असतं, त्यावेळेस देखील माझी हिच भूमिका असती,असे गीता जैन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच माझा मुद्दा फक्त अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीवर आहे, तो कोणत्या भाषेचा आहे याच्यावर नाही. अधिकाऱ्याने स्वत:ला वाचवायला अधिकाऱ्याचे नाव घेतले असल्याचे गिता जैन यांनी आरोप केला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान आज प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मराठी नाटकांच्या निर्मात्यांना आवश्यक सवलत, तारखा आणि प्राधान्य देण्याबाबत आज सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गिता जैन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या थिएटरमध्ये मॅनेजरसोबत वाद घालत आहेत. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात सुमीन मंडळाचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता ठरला होता. पण त्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी दुपारी ‘करून गेला गाव’ या मराठी नाटकाचे बुकिंग झाले, आणि ते सायंकाळी 6.10 वाजता संपले. काही तांत्रिक समस्यांमुळे हा प्रकार घडला होता. या घटनेवरून गीता जैन संतापल्या आणि त्यांनी थिएटरटच्या मॅनेजरला कठोर शब्दात सुनावले होते. या दरम्यान मॅनेजरने आमदाराची माफी देखील मागितली होती. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : No-Confidence Motion: ‘…तर मी तुमची औकात काढेल’, राणेंनी लोकसभेत का वापरले असे शब्द?

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT