सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule cm aditya thackeray deputy cm uddhav thackeray sharad pawar deal reason of shivsena split bjp chandrashekhar bawankule
supriya sule cm aditya thackeray deputy cm uddhav thackeray sharad pawar deal reason of shivsena split bjp chandrashekhar bawankule
social share
google news

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला मंगळवारी 20 जूनला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या बंडाला भाजपची साथ होती, हे वेळोवेळी समोर आले आहे. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी शिवसेना फुटीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे (supriya sule) यांना मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लान आखला गेला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात या संदर्भातील ड़ील देखील झाली होती. या डीलमुळेच शिवसेना फुटल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (supriya sule cm aditya thackeray deputy cm uddhav thackeray sharad pawar deal reason of shivsena split bjp chandrashekhar bawankule)

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी एका कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात झालेल्या गुप्त डीलची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री राहणार होते.त्यानंतर 2024 च्या निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार होते. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणण्याची संख्या देखील कमी होणार होती. या बाबतची कुणकुण शिवसेना आमदारांना लागली होती, त्यामुळेच ते भडकले होते.

हे ही वाचा : ‘शिवसेनेतून राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो..’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या आमदारांना निवडून आणण्याचे लक्ष्य?

शरद पवार यांनी 100 आमदारांना निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले होते. राज्यात सरकार बनल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मंत्रालयापर्यंत जाता येत नव्हते आणि त्यांच्याकडे पेन देखील नव्हता. तर तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात काम करत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 100 आमदारांना निवडून आणण्याच्या लक्ष्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना निवडून न येण्याची भिती सतावत होती.या भितीपाईच आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचा दावा चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केला आहे.

हे वाचलं का?

जून-जुलै दरम्यान एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. यानंतर शिवसेनेच्या 13 खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. एकनाथ शिंदेंसोबत आमदार सुरतला गेले, नंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाऊन भाजपसोबत राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. या सरकारला आव्हान देखील देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरी मान्यता दिली. यासोबत निवडणूक आयोगाने शिंदेच्या शिवसेनेला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. तर ठाकरेंच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले होते.

हे ही वाचा :  बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT