30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन
अजित पवार गटाने आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगात केला आहे. याची प्लॅनिंग 30 जून रोजी झाली होती.
ADVERTISEMENT
Politics of Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटाने ताकद लावण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी (5 जुलै) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाची बैठक झाली. यात अजित पवारांनी आपल्या बाजूला सर्वाधिक आमदार असल्याचे दाखवले. त्यानंतर आता ही लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात गेली असून, याची सुरुवात बंडखोरीच्या दोन दिवस आधी म्हणजे 30 जून रोजीच झाली होती. काय घडलं होतं त्या बैठकीत? (Sharad Pawar vs Ajit Pawar : The war to capture the Nationalist Congress Party (NCP) has intensified.)
ADVERTISEMENT
गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी 2 जुलै रोजी बंड केले. पण, याची खरी सुरूवात झाली होती 30 जून रोजी. अजित पवारांनी 30 जून रोजीच भाजपसोबत जाण्याचा, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकण्याचा प्लॅन तयार झाला होता.
30 जून रोजी अजित पवारांच्या बैठकीत काय घडलं?
अजित पवार गटाने आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगात केला आहे. याची प्लॅनिंग 30 जून रोजी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.
हे वाचलं का?
ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला होता, ज्यात शरद पवार यांना हटवून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे लिहिले होते.
वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!
बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एवढेच नाही तर अजित पवार गटाने त्याच दिवशी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावाही केला होता. कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात राष्ट्रवादी काँग्रेस लोकहिताच्या उद्दिष्टापासून दूर जात आहे, अशा स्थितीत शरद पवार यांच्याऐवजी अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे लिहिले होते. अजित पवार गटानेही 30 जून रोजी मुंबई येथे कार्यकारिणीची बैठक झाल्याची माहिती दिली होती.
ADVERTISEMENT
दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला काय म्हटले?
अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर आणि चिन्हावरील दाव्याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. बंडखोरीनंतर शरद पवार गटाने अर्ज केला होता. त्यात कुणी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगत असेल, तर आयोगाने शरद पवार यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे म्हटलेले आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार गटाने चाळीसहून अधिक आमदारांच्या प्रतिज्ञापत्रासह पक्षावर दावा केला. अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्रात चाळीसहून अधिक आमदार/खासदार आणि आमदारांच्या सह्या असल्याचे सांगितले आहे. मात्र, बुधवारी त्यांच्या बैठकीला केवळ 31 आमदार पोहोचले होते. अजित म्हणाले की, काही आमदार शहराबाहेर आहेत. त्यामुळेच ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
शरद पवार यांच्या पक्षाने बंडखोरी करून पक्षांतर केलेल्या आमदारांची माहिती आयोगाला दिली. सत्ताधारी आघाडीत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहितीही आयोगाला देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्यासह मंत्री करण्यात आलेल्या पक्षाच्या 9 आमदारांना अपात्र करण्याची मागणीही केली. सध्या आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.
‘निवडणूक चिन्ह आणि पक्ष सोडणार नाही’
पक्ष किंवा चिन्ह हिसकावून घेण्याची संधी कोणाला देणार नाही, असे आश्वासन शरद पवारांनी समर्थकांना दिले. ते म्हणाले, जर ते तिथे (निवडणूक आयोग) गेले असतील तर ते माझा फोटो का वापरत आहेत? मी माझे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव त्यांच्या हातात जाऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी (अजित पवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आणि म्हणाले, ‘इतक्या वर्षांत त्यांनी असा मुख्यमंत्री पाहिला नाही’, पण आज ते त्यांच्याचसोबत गेले आहेत”.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT