BMC: उद्धव ठाकरेंना घेरलं, ‘त्या’ प्रकरणी फडणवीसांकडून प्रचंड मोठी घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (19 जून) कल्याणमध्ये एका जाहीर सभेत सांगितलं की, मुंबई महापालिकेत झालेल्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी SIT ची स्थापना करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

कल्याण: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (19 जून) कल्याणमध्ये एका जाहीर सभेत एक मोठी घोषणा करत शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आता घेरण्याची सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) कोरोना (Corona) काळातील जी नॉन-कोव्हिड कामं (Non-Covid Work) झाली होती त्याच्या 12 हजार कोटींच्या कामाबाबत कॅगकडून (CAG) अहवाल जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आल्यानंतर याच प्रकरणी आता SIT नेमण्यात आल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. (uddhav thackeray bmc cag audit 12 thousand crore rupees scam shiv sena ubt bjp devendra fadnavis)
देवेंद्र फडणवीसांकडून SIT ची घोषणा
‘आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेत कॅगच्या अहवालात आलं आहे की, साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा त्याठिकाणी शिवसेनेच्या, उद्धवजींच्या नेतृत्वात झाला. आजच एकनाथ शिंदे यांनी एसआयटी तयार केली आहे. त्या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातील पै-पै परत आणण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं थेट नाव घेत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांबाबत कॅगने काय ठेवलाय ठपका?
CAG चौकशी करण्याचा 31 ऑक्टोबर, 2022 चा आदेश
• मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी
• 12,023.88 कोटी रूपयांचा BMC च्या 9 विभागांनी केलेला खर्च.
• 28 नोव्हेंबर, 2019 ते 31 ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील कामे.
• स्पेशल ऑडीटला 14 नोव्हेंबर, 2022 रोजी CAG ची मंजुरी
• BMC ने कोविड कायद्याचा आधार घेत 3538.73 कोटींची चौकशी न करण्याची भूमिका घेतली.