शिवसेना विरुद्ध शिवसेना… पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिंदे-ठाकरे आमनेसामने; उद्याच….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray group will once again request an early hearing in the Supreme Court on Tuesday in the Shiv Sena vs Shiv Sena case
Uddhav Thackeray group will once again request an early hearing in the Supreme Court on Tuesday in the Shiv Sena vs Shiv Sena case
social share
google news

MLA Disqualification: राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून दोन्ही शिवसेनेत (Shivsena) वाद रंगलेला असतानाच मंगळवारी हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. कारण शिवसेने विरुद्ध शिवसेना म्हणजे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हा वाद चालू असतानाच मंगळवारी ठाकरे गट पुन्हा एकदा ही सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Legislative Assembly President Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

ठाकरे गटाची मागणी काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वकिलांकडून खंडपीठासमोर ही सुनावणी लवकर करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटच खरी शिवसेना हा निर्णय दिल्यानंतर सभापतींच्या त्या निर्णयाविरोधात आव्हान दिले आहे.

हे ही वाचा >>  Weight Loss: फक्त उभं राहून तुमचं वजन होईल कमी?

हीच शिवसेना खरी

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले होते. तसेच निवडणूक आयोगाकडूनही ते मान्य करण्यात आले आहे, त्यामुळेच त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आल्याचे सांगण्ताय आले आहे.

हे वाचलं का?

शिंदे सीएम पदावर विराजमान

शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे मात्र शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवरही दावा केला. त्यानंतर राजकीय नाट्य घडवत हीच खरी शिवसेना असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनाही बेदखल करण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले. त्यातच शिंदे गट हीच खरी शिवसेना हा निर्णय दिल्याने आता पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक होत त्यांनी त्यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

हे ही वाचा >>बायकोला प्रियकरासोबत दारू पिताना पकडलं, संतापलेल्या नवऱ्याने….काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT