‘इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते’, उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचलं, काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray slams pm narendra modi. thackeray said some people have allergy of india word
Uddhav Thackeray slams pm narendra modi. thackeray said some people have allergy of india word
social share
google news

– मनीष जोग, जळगाव

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Narendra Modi : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उद्धव ठाकरेंनी नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. मणिपूर हिंसाचार, इंडिया आघाडीवरून ठाकरेंनी मोदींना खडेबोल सुनावले. (uddhav Thackeray Attack on Narendra Modi over using bharat instead of india)

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींवर नाव न घेता निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “सरदार पटेल हे दृष्टीचे नेते होते. त्यांनी त्या काळात आरएसएसवर बंदी आणली होती. त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम, देशप्रेम कळत होतं. जगातील सगळ्यात उंच पुतळा कुठे उभे केला, हे तुम्हाला माहितीये. पुतळ्याची उंची ठिक आहे. कामाची उंची कधी गाठणार?”, असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला.

हे वाचलं का?

“इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते”

विरोधकांनी इंडिया आघाडीने एनडीए विरोधात मोट बांधण्यास सुरूवात केलीये. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने इंडिया ऐवजी भारत असा शब्दप्रयोग करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?

यावरूनच ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला. “17 सप्टेंबर येतोय. सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाडा स्वतंत्र केला होता. भारतामध्ये आणला. आता भारत बोललं पाहिजे. कारण काहींना इंडियाची अॅलर्जी. इंडिया बोलल्यावर काहीजणांना खाज सुटायला लागलेली आहे. आजपर्यंत इंडिया इंडियाचा गवगवा होता. व्होट फॉर इंडिया होतं. आता आपण इंडिया म्हटलो तर यांना खाज सुटली”, असं म्हणत ठाकरेंनी मोदींना डिवचलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> G20 Summit : भारत-मध्य पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरमुळे चीनचं वाढणार टेन्शन?

तकलादू पुरुष; उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावले

“ज्या दिवशी जिन्नाचं निधन झालं होतं. त्याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेलांनी फौजा घुसवल्या आणि रझाकारांचे अत्याचार थांबवले. मराठवाडा आपल्या देशात सामील केला. वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी यांची मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाही आणि म्हणे पौलादी पुरुष. कसले पौलादी पुरुष… तकलादू पुरुष आहात”, असे खडबोल ठाकरेंनी मोदींना सुनावले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT