मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे मोठा धक्का, 5 दिवसांपूर्वी निवडून आलेल्या महिला नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश करणार

ऋत्विक भालेकर

Uddhav Thackeray : या घडामोडीनंतर शिवसेना युबीटीच्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या आता 64 वर आली आहे. ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी कठिण परिस्थिती असताना जोर लावला होता. मात्र, अवघ्या 5 दिवसात नगरसेविकेने साथ सोडलीये.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे मोठा धक्का

point

5 दिवसांपूर्वी निवडून आलेल्या महिला नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray ,मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी जोर लावला. मात्र, निवडून येताच नगरसेविकेने पक्षाची साथ सोडलीये. 

सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना युबीटीकडून सुरू

डॉ. सरिता म्हस्के या शिवसेना युबीटीच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवली असून, त्या शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, गट नोंदणीच्या प्रक्रियेसाठी शिवसेना युबीटीचे सर्व नगरसेवक नवी मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र या प्रक्रियेतही डॉ. सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.  या घडामोडीनंतर शिवसेना युबीटीच्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या आता 64 वर आली आहे. ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी जोर लावला होता. कठीण काळात ठाकरे बंधूंनी 71 नगरसेवक निवडून आणले. मात्र, निकालानंतर 5 दिवसांनी नगरसेवक सरिता म्हस्के यांनी साथ सोडली. दरम्यान, यानंतर सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना युबीटीकडून सुरु झालीये. 

हेही वाचा : केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं

मुंबई महापालिका निवडणूक निकाल; कोणी किती जागा जिंकल्या?

भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1

हे वाचलं का?

    follow whatsapp