Supriya Sule : पाटलांवरून सुळे लोकसभेत भाजपवर बरसल्या, काय म्हणाल्या?
supriya sule speech in lok sabha marathi : सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा भाजपवर सडकून टीका केली. महिलांबद्दल भाजपची मानसिकता प्रतिगामी असल्याचे सांगत त्यांनी लक्ष्य केले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानांचाही त्यांनी उल्लेख केला.
ADVERTISEMENT

Supriya sule speech in Parliament on women’s reservation bill : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. विधेयकावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील आणि अब्दुल सत्तारांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत भाजपवर हल्ला चढवला. भाजपची महिलांबद्दल हीच मानसिकता आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे भाजपवर बरसल्या.
महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली. या विधेयकाला पाठिंबा देत त्यांनी काही मुद्दे अधोरेखित केले.
हेही वाचा >> Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं’, अजित पवार गटाची टीका
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वर्तमानपत्र वाचले. त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, मला विधेयक आणण्याच्या इच्छाशक्तीबद्दल बोलायचं नाहीये, पण काही मुद्दे मांडायचे आहेत, जे गंभीर आहेत. कॅनडामुद्दावर सरकारने चर्चा घ्यावी. महाराष्ट्रात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरही चर्चा घ्यावी. कांदा प्रश्न, दुष्काळावरही चर्चा घ्यावी. आम्ही सरकारला पाठिंबा देऊ.”
महाराष्ट्र पहिले राज्य…
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुलेंनी शिक्षण दिले. त्यामुळे माझ्यासारखी महिला इथे उभी आहे. महिला धोरणाची सुरूवात राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली. पंचायत राज मध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. माझे वडील शरद पवारांनी हे लागू केलं”, असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.