Rohit Pawar : ‘अजूनही वेळ गेलेली नाही…’ रोहित पवारांचा नेमका इशारा कुणाला

रोहित गोळे

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी असलेले अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे आमदारही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सहभागी झाले त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न निर्माण झाला. पक्षाचा प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहे याची माहिती मात्र देण्यात आली […]

ADVERTISEMENT

rohit pawar ajit pawar sharad pawar maharashtra gov
rohit pawar ajit pawar sharad pawar maharashtra gov
social share
google news

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी असलेले अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे आमदारही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सहभागी झाले त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न निर्माण झाला. पक्षाचा प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहे याची माहिती मात्र देण्यात आली नाही. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी सूचक इशारा देत अजूनही वेळ गेलेली नाही असं विधान करुन अजित पवार गटाला एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

अजित पवार गटासोबत नेमके किती आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र अजूनपर्यंत अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे अजून स्पष्ट केले नाही. त्यामुळे हा आकडा जाहीर करावा असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >>Maratha Reservation : CM शिंदे यांची मोठी घोषणा! OBC म्हणून आरक्षण देणार, पण…

बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो

अजित पवार यांनी राष्ट्रवादी पासून वेगळा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कुणाची हा सवालही उपस्थित होऊ लागला. त्यानंतर नेत्यांनी राष्ट्रवादी एकच असल्याचे सांगितले गेले. अजित पवारांसोबत जात वेगळा गट निर्माण करणाऱ्या आमदारांकडून आता शरद पवार यांचा फोटो वापरला जात आहे. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे. त्यामुळे शरद पवार यांनीही फोटो वापरणाऱ्या आमदारांना एक प्रकारचा सूचक इशारा दिला आहे.

आपण न्यायालयात जाणार

अजित पवार यांच्याबरोबर वेगळा गट स्थापन करणाऱ्या आमदार, मंत्रीसुद्धा आता शरद पवार यांचा फोटो वापरत आहेत. त्यामुळे पक्षाबाबत अजून निर्णय झाला नसला तरी आपण न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात आमदार आणि शरद पवार का निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp