Women Reservation : 5 कारणं… महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?
Women Reservation bill Explained : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के जागां आरक्षित करण्यासाठीचे हे बिल आहे. पण, महिलांना आरक्षण देण्याची गरज का निर्माण झाली आहे…
ADVERTISEMENT

Women Reservation bill Debate : तीन दशकांपासून अडकून पडलेलं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं आहे. अनेक वर्षांपासून राजकारणात महिलांना आरक्षण देण्याची मागणी होत आलीये. पण, लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण का गरजेचं आहे. तेच समजून घ्या… (Why is reservation for women important in politics?)
देशातील महिलांची लोकसंख्या 46 टक्क्यांहून अधिक आहे. पण राजकारणात संसदेत आणि विधानसभांमध्ये त्यांचा सहभाग नाममात्र आहे. हा सहभाग वाढवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याच्या उद्देशाने ‘नारी शक्ती वंदन कायदा’ आणण्यात आला आहे.या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव होतील.
महिलांना आरक्षण देणारे हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘एक पवित्र सुरुवात होत आहे. एकमताने कायदा झाला तर त्याची ताकद अनेक पटींनी वाढेल.’
हे विधेयक 27 वर्षांपासून संसदेत अडकले आहे. आणि कायदा बनवून त्याची अंमलबजावणी व्हायला खूप वेळ लागू शकतो. मात्र या विधेयकाची गरज का पडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.