राज ठाकरेंनी ब्रिजभूषण सिंहांच्या विरोधात थोपटले ‘दंड’! PM नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन (wrestlers protest news marathi) सुरू आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
ADVERTISEMENT

wrestlers protest news update : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन (wrestlers protest news marathi) सुरू आहे. 28 मे रोजी जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंना गराडा घालत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण चिघळलं आहे. दिवसेंदिवस आंदोलनं तीव्र होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यावरून इशारा देणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पहिल्यांदाच दंड थोपटले आहेत. राज यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. (wrestlers protest news today)
राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत की, “आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.”
कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण…, राज ठाकरेंनी काय म्हटलंय?
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, “ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.”
हेही वाचा >> जेजुरी विश्वस्त वाद : 5 माणसांमुळे जेजुरीकर भडकलेत, समजून घ्या वाद काय?
“रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्या न्याय मिळावा, आणि या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही, इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजेच अर्थात आपणाकडून हवी आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.