Ind vs Eng Test : ‘लॉर्ड्स’वरील वाघांचं ‘लीड्स’वर लोटांगण! भारताचा लाजिरवाणा पराभव
लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी डाव सावरत पडझड रोखली. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागेल, असं वाटत असतानाच चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली. चेतेश्वर पुजारा विराटनंतर आलेल्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतलं. या विजयाबरोबर इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली […]
ADVERTISEMENT

लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी डाव सावरत पडझड रोखली. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागेल, असं वाटत असतानाच चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली. चेतेश्वर पुजारा विराटनंतर आलेल्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतलं. या विजयाबरोबर इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारता पूर्ण डाव ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही आक्रमक मारा केला. इंग्लडच्या माऱ्यासमोर चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, विराट कोहली वगळता इतर फलंदाजांनी इंग्लडच्या गोलंदाजांसमोर हाराकिरी पत्करल्याचं दिसलं.
सुरुवातीच्या दोन दिवसांवर इंग्लंडच्या संघानं वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कामगिरी उंचावत सामन्यातील रंगत टिकवून ठेवली होती. मात्र, चौथ्या दिवशी डावाच्या सुरूवातीलाच चेतेश्वर पुजारा (९१) तंबूत परल्यानंतर फलंदाजी ढेपाळली. कर्णधार विराट कोहली (५५) नंतर अंजिक्य रहाणे आणि ऋषभ पंत फार काळ खेळपट्टी तग धरू शकले नाही.
England win the third #ENGvIND Test at Headingley & level the series 1-1 against #TeamIndia.
We will look to bounce back in the fourth Test, starting September 2.
Scorecard ? https://t.co/FChN8SDsxh pic.twitter.com/bwV926w2Vt
— BCCI (@BCCI) August 28, 2021
चौथ्या दिवशी मैदानावर काय झालं?