Video : W,O,W,W,4,W…फायनल सामन्यात मोहम्मद सिराजची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी
आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आतापर्यंतची करिअरमधली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरूद्धचा सामन्यात सिराजने एकट्याने 6 विकेट घेतल्या आहेत.
ADVERTISEMENT

आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आतापर्यंतची करिअरमधली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरूद्धचा सामन्यात सिराजने एकट्याने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याला हार्दीकच्या 3 आणि जसप्रीत बुमरामच्या 1 विकेटची साथ लाभली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 50 धावावर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आता 51 धावांचे आव्हान असणार आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. टीम इंडियाकडून पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहने टाकली. बुमराहने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कुसल परेराची विकेट घेतली.
हे ही वाचा : IND vs SL : मोहम्मद सिराजने हॅटट्रिकसाठी बॉल फेकला अन्…, कोहली-गिलने घेतली मजा!
यानंतर श्रीलंकेने सावरण्याचा प्रयत्न केला आणि 3 ओव्हरमध्ये 1 गडी बाद 8 धावा केल्या.यानंतर सामन्यातले चौथे षटक टाकायला आला.आणिस त्याने सामन्याची दिशाच बदलली. मोहम्मद सिराजने या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 4 धावा देत 4 मोठे बळी घेत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. मोहम्मद सिराजच्या धारदार गोलंदाजीसमोर श्रीलंका पुर्णत बॅकफुटवर गेला.
मोहम्मद सिराजने या सामन्यात 7 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. या कामगिरीसह मोहम्मद सिराजने वनडेत 50 विकेटस पुर्ण केल्या. यासोबत भारताकडून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.