पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा पराभव; भारताचे हे चौघं ठरले विजयाचे शिल्पकार

मुंबई तक

India vs Australia 1st ODI: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली. शुक्रवारी (17 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना झाला. हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे 4 हिरो होते, ज्यांनी ऑस्ट्रेलियाची चारही बाजूंनी कोंडी करत विजय मिळवला. हे चार हिरो आहेत वेगवान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

India vs Australia 1st ODI: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली. शुक्रवारी (17 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना झाला. हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे 4 हिरो होते, ज्यांनी ऑस्ट्रेलियाची चारही बाजूंनी कोंडी करत विजय मिळवला. हे चार हिरो आहेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर केएल राहुल. (Australia lost in first ODI; These four of India became the architect of victory)

जडेजाची अष्टपैलू कामगिरी

सर्वप्रथम, मॅन ऑफ द मॅच जडेजाबद्दल बोलूया. त्याने प्रथम गोलंदाजीत 2 बळी घेतले. यानंतर 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 83 धावांवर 5 विकेट गमावत असताना जडेजाने अप्रतिम फलंदाजी दाखवत 69 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. जडेजाने राहुलसोबत सहाव्या विकेटसाठी 123 चेंडूत 108 धावांची नाबाद भागीदारी केली.

WPL 2023 : स्पॉन्सरच नाही! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या लेकीने हातानेच लिहिले नाव…

हे वाचलं का?