ODI WC 2023: भारत-पाक सामन्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

india vs pakistan world cup date changed icc odi world cup 2023 schedule announced
india vs pakistan world cup date changed icc odi world cup 2023 schedule announced
social share
google news

India vs Pakistan Match World cup : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप (odi world cup 2023) सामन्याचे वेळापत्रक आयसीसीने (Icc) जाहीर केले आहे.येत्या 5 ऑक्टोबरपासून या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप सामन्यात क्रिकेट फॅन्सना सर्वाधिक उत्सुकता भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची आहे. पण आता या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.त्यानुसार आता नवीन तारखेला हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.या सामन्याची नेमकी तारीख काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. (india vs pakistan world cup date changed icc odi world cup 2023 schedule announced)

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत रंगणार आहे. वर्ल्ड कप वेळापत्रकानुसार हा सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. पण आता या सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

वर्ल्ड कप वेळापत्रकानुसार, भारत-पाकिस्तान सामना हा 15 ऑक्टोबरला रंगणार होता. मात्र आता या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. सुत्रानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना एक दिवस आधी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 15 ऑक्टोबरपासून देशात नवरात्रीला सुरूवात होणार आहे. याच कारणामुळे सामन्याची तारीख बदलल्याची चर्चा आहे. या बदलासह इतर आणखीण बदल होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरं तर 15 तारेखला नवरात्रीचा पहिला दिवस येतोय, आणि याच दिवशी भारत-पाकिस्तान सामना देखील होता. त्यामुळे दोन्ही मोठ्या इवेंटवर लक्ष ठेवणे सुरक्षा एजन्सीसाठी अवघड जाणार होते. त्यामुळे सुरक्षा एजन्सीने बीसीसीआयकडे सामन्याची तारीख बदलण्याची मागणी केली होती. यावर आता 14 ऑक्टोबरला सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचे ‘या’ दिवशी सामने

8 ऑक्टोबर विरूद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरूद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर विरूद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरूद्ध बांग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरूद्ध न्युझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरूद्ध इग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरूद्ध क्वालिफायर 2, मुंबई
5 नोव्हेंबर विरूद्ध साऊथ अफ्रीका, कोलकत्ता
11 नोव्हेंबर विरूद्ध क्वालिफायर 1 , बंगळुरू

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime: लग्नानंतर अडीच महिन्यातच घेतला स्वत:चा जीव, कारण पत्नी…

आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक 

ADVERTISEMENT

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस?

पहिला सेमी फायनल सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि दुसरा सेमी फायनल दुसऱ्य़ा दिवशी 16 नोव्हेंबरला कोलकात्तात रंगणार आहे. या दोन्ही सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. तर फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 नोव्हेंबरला रंगणार आहे. या फायनल सामन्यासाठी 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT