क्रिकेटपटू शिवम दुबे अडकला लग्नाच्या बेडीत, मैत्रीण अंजुम खानशी विवाहबद्ध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे लव्ह जिहाद प्रकरणावरुन संपूर्ण देश आणि राज्यात विविध चर्चांना उधाण आलेलं असताना, भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबेने वेगळं उदाहरण घालून दिलंय. लग्न हा दोन व्यक्ती आणि परिवाराच्या सहमतीने होणारा निर्णय असतो, यात जात-पात, धर्म या गोष्टी आडव्या येत नाहीत. आपली मैत्रीण अंजुम खानसोबत शिवम दुबेने लग्नगाठ बांधली आहे.

ADVERTISEMENT

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवम दुबेने आपल्या या विवाहसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये महत्वपूर्ण इनिंग खेळणाऱ्या शिवमने आता आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. “आम्ही प्रेमावर प्रेम केलं… जे प्रेमापेक्षा जास्त होतं.. आता आमचं नवं आयुष्य सुरु होतं आहे….जस्ट मॅरिड !”, अशी कॅप्शन देत शिवमने पत्नी अंजुमसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शिवमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवदाम्पत्य फारच आनंदात दिसत आहे. एकूण तीन फोटो शिवमने शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये उभयतांनी कॅमेराकडे पाहून स्मितहास्य केलंयं तर दुसऱ्या फोटोत अंजुम खान दुवा मागताना दिसून येत आहे. तर तिसऱ्या फोटोत शिवम अंजुमच्या बोटात अंगठी घालत आहे. शिवमच्या या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

शिवमने भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. त्याने १३ टी ट्वेन्टी आणि एका एकदिवसीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो शेवटच्या वेळी फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. आयपीएलमध्ये शिवम विराट कोहलीच्या RCB संघाकडून खेळायचा. परंतू यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT