IPL Media Rights: 43 हजार कोटींना विकले आयपीएलचे मीडिया हक्क; BCCI होणार मालामाल
आयपीएल मीडिया राइट्स (IPL Media Rights) लिलावामधील दोन पॅकेजेसचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आयपीएलच्या टीव्ही हक्कांचा लिलाव झाला. यामध्ये प्रत्येक सामन्याला 57.5 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत. त्याच वेळी, डिजिटल अधिकारांचा लिलाव प्रति सामन्यासाठी 48 कोटी रुपये करण्यात आला आहे. हे पुढील पाच वर्षांसाठी आहे. क्रिकबझने याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच […]
ADVERTISEMENT
आयपीएल मीडिया राइट्स (IPL Media Rights) लिलावामधील दोन पॅकेजेसचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आयपीएलच्या टीव्ही हक्कांचा लिलाव झाला. यामध्ये प्रत्येक सामन्याला 57.5 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत. त्याच वेळी, डिजिटल अधिकारांचा लिलाव प्रति सामन्यासाठी 48 कोटी रुपये करण्यात आला आहे. हे पुढील पाच वर्षांसाठी आहे.
ADVERTISEMENT
क्रिकबझने याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना दाखवण्यासाठी बीसीसीआयला एकूण 105.5 कोटी रुपये मिळणार आहेत. हा लिलाव पुढील पाच वर्षांच्या हक्कांसाठी आयोजित केला गेला होता, म्हणजेच BCCI 2023 ते 2027 या कालावधीतील मीडिया अधिकारांची विक्री करत आहे.
पॅकेज-अ आणि पॅकेज-बी या दोन श्रेणींसाठी हा लिलाव करण्यात आला आहे. या दोन श्रेणींसाठी एकूण 43,255 कोटी रुपये सांगितले जात आहेत. पॅकेज-ए ची एकूण किंमत 23,575 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे. पॅकेज-ए भारतातील टीव्ही अधिकारांसाठी आहे तर पॅकेज-बी ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकारांसाठी आहे. यामध्ये एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की पॅकेज-ए जिंकणारी कंपनी पॅकेज-बी जिंकणाऱ्या कंपनीला एक कोटी अतिरिक्त रकमेसह आव्हान देऊ शकते.
हे वाचलं का?
ईपीएलला मागे टाकत आयपीएलची सरशी
एका सामन्यातून कमाईच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला (ईपीएल) मागे टाकले आहे. इंग्लंडच्या फुटबॉल लीगची किंमत प्रति सामन्यासाठी 81 कोटी रुपये आहे, परंतु आयपीएलने त्याला मागे टाकले आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगने लिलावाच्या पहिल्याच दिवशी हा आकडा पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी अधिक बोली लावली गेली.
दोन पॅकेजेसचा लिलाव होणे बाकी
बीसीसीआयने लिलावाची चार पॅकेजेसमध्ये विभागणी केली आहे. पॅकेज-अ आणि बी चा लिलाव झाला असून आता पॅकेज-सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज-सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यांसाठी अनन्य अधिकारांचा समावेश आहे. त्याच वेळी, पॅकेज-डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार समाविष्ट आहेत. सोमवारीच या दोघांचाही लिलाव होणार आहे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत स्टार प्रक्षेपण करत होते
2017 ते 2022 पर्यंत स्टार स्पोर्ट्सकडे आयपीएलचे मीडिया हक्क होते. या दिग्गज कंपनीने 16 हजार कोटी रुपये मोजून हे हक्क मिळवले होते. या रकमेत त्याच्याकडे टीव्ही आणि डिजिटल दोन्ही हक्क होते. मात्र यावर्षी दोघांचा स्वतंत्रपणे लिलाव करण्यात आला आहे. स्टारचे डिजिटल प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टार आयपीएल सामने ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी वापरले जाते.
ADVERTISEMENT
या कंपन्यांमध्ये हक्क घेण्यासाठी चुरस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे Viacom18 हे टीव्ही आणि डिजिटल दोन्ही हक्कांसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. डिजिटल अधिकारांसाठी सर्वात मोठ्या बोलीसाठी अॅमेझॉन आघाडीवर असेल अशी बेझोस यांची अपेक्षा होती, परंतु कारण न देता त्यांनी शर्यतीतून माघार घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT