Video : W,O,W,W,4,W…फायनल सामन्यात मोहम्मद सिराजची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mohmmed siraj takes 6 wicket complete 50 odi wicket against srilanka asia cup 2023 team india
mohmmed siraj takes 6 wicket complete 50 odi wicket against srilanka asia cup 2023 team india
social share
google news

आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने आतापर्यंतची करिअरमधली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरूद्धचा सामन्यात सिराजने एकट्याने 6 विकेट घेतल्या आहेत. त्याला हार्दीकच्या 3 आणि जसप्रीत बुमरामच्या 1 विकेटची साथ लाभली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 50 धावावर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आता 51 धावांचे आव्हान असणार आहे.

ADVERTISEMENT

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. टीम इंडियाकडून पहिली ओव्हर जसप्रीत बुमराहने टाकली. बुमराहने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कुसल परेराची विकेट घेतली.

हे ही वाचा : IND vs SL : मोहम्मद सिराजने हॅटट्रिकसाठी बॉल फेकला अन्…, कोहली-गिलने घेतली मजा!

यानंतर श्रीलंकेने सावरण्याचा प्रयत्न केला आणि 3 ओव्हरमध्ये 1 गडी बाद 8 धावा केल्या.यानंतर सामन्यातले चौथे षटक टाकायला आला.आणिस त्याने सामन्याची दिशाच बदलली. मोहम्मद सिराजने या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 4 धावा देत 4 मोठे बळी घेत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. मोहम्मद सिराजच्या धारदार गोलंदाजीसमोर श्रीलंका पुर्णत बॅकफुटवर गेला.

हे वाचलं का?

मोहम्मद सिराजने या सामन्यात 7 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 6 विकेट घेतल्या.  या कामगिरीसह मोहम्मद सिराजने वनडेत 50 विकेटस पुर्ण केल्या. यासोबत भारताकडून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

मोहम्मद सिराजला या सामन्यात हार्दीकच्या 3 आणि जसप्रीत बुमरामच्या 1 विकेटची साथ लाभली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 50 धावावर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आता 51 धावांचे आव्हान असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आशिया कपच्या फायनल सामन्यात 51 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाने अवघ्या 6 ओव्हर आणि एक चेंडूत ही धावसंख्या गाठली. आणि आठव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. टीम इंडियाकडून शुभमन गिलने 27 आणि ईशान किशनने 23 नाबाद धावा करून हा सामना जिंकला.

हे ही वाचा : Vishwakarma Yojana : स्टायपेंड… 3 लाख कर्ज; मोदींनी लॉन्च केलेली विश्वकर्मा योजना काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT