Devendra Fadnavis : ‘किमान गोपीनाथ मुंडेंचे तरी व्हा’, फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार
मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत.
ADVERTISEMENT

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhaji Nagar : मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. तब्बल 7 वर्षानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी सरकारकडून घोषणा केल्या जाऊ शकतात. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर ट्विट केले आहे. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यासाठी करण्यात आलेल्या घोषणांची आठवण करून देत तक्रारींचा पाढा वाचला आहे.
हेही वाचा >> ‘…तरचं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार’, विनोद पाटलांनी काढला तोडगा
अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, “मराठवाड्यासाठी 2016 साली शेवटची कॅबिनेट बैठक देवेद्र फडणवीस सरकारने संभाजीनगरला घेतली होती. आजही ते ‘सुपर सीएम’ च्या भूमिकेत या खोके सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी 49020 कोटींची घोषणा केवळ मराठवाड्यासाठी केली होती. त्यावेळी झालेल्या घोषणांपैकी जवळपास सगळ्याच अपूर्ण आहेत. काही मोजक्या घोषणांबाबत मी आज विचारतो आहे”, असे म्हणत अंबादास दानवे यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.
अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल
1) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
2) धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. भीक देत आहात का?
3) सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
4) नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे 250 कोटी कुठे आहेत? भंपक वागण्यातून देव देवतांना तरी सोडा?
5) लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का?
6) मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी?