अजित पवारांच्या बंडामुळे भाजपच्या स्नेहलता कोल्हेंची का झाली कोंडी?
राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाच्या काळात आशुतोष काळे हे परदेशात होते. परदेशात असताना त्यांनी सुरुवातीला शरद पवार यांना पाठींबा दर्शवला.
ADVERTISEMENT

Ajit Pawar : वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली. आता राष्ट्रवादीत फुटली आहे. त्यानंतर घडणाऱ्या घटना पाहता अनेक गोष्टी घडताना दिसतायेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नेते, आमदार दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. त्यातच आधी पवारांना पाठिंबा देणारे काही आमदार आता अजितदादांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भारतात येताच थेट अजित पवारांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. आता काळे यांनी जरी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला असला, तरी तिकडे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांची धाकधूक वाढली आहे. काळेंनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने कोल्हेंची कशी अडचण होऊ शकते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाच्या काळात आशुतोष काळे हे परदेशात होते. परदेशात असताना त्यांनी सुरुवातीला शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलत अजित पवारांना पाठींबा घोषित केला. परदेशातून भारतात येताच काळे यांनी थेट अजितदादांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर दादांसोबतचा फोटो ट्विट केले.
ते म्हणतात, ‘कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला. शरदचंद्रजी पवार आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे’, असं काळे म्हणाले.
काळेंमुळे कोल्हेंची कशी होणार अडचण?
आशुतोष काळे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. अवघ्या 822 मतांनी स्नेहलता कोल्हे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. याआधी 2014 साली स्लेहलता यांनी काळेंचा पराभव केला होता. तेव्हा काळे हे शिवसेनेमध्ये होते. 2019 ला चित्र पलटलं आणि काळे अगदी थोड्या फरकाने विजयी झाले.










