Advertisement

'तुमची पोरं सांभाळा नाहीतर...'; भाजप खासदार अनिल बोंडेंचा मुस्लीम समुदायाला इशारा, काय आहे प्रकरण?

अमरावतीत मुस्लीम तरुणाने उच्चशिक्षित मुलीशी बळजबरी विवाह केल्याचा बोंडेंचा आरोप
BJP MP Anil Bond claims that this is a case of love jihad
BJP MP Anil Bond claims that this is a case of love jihad

भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी लव्ह जिहादसंदर्भाने धक्कादायक आरोप केला आहे. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुस्लीम मुलाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने विवाह केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहेत. अनिल बोंडे यांनी थेट मुस्लीम समुदायाला इशाराही दिला.

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती येथील रुग्णालयात जाऊन संबंधित तरुणीची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार अनिल बोंडे यांनी हिंदू मुलीशी बळजबरी विवाह केल्याचा आरोप केला आहे.

अमरावतीत लव्ह जिहादची घटना?; अनिल बोंडेंचा आरोप काय?

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे, नववीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुस्लीम तरुणाने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीशी जबरदस्तीने विवाह केला आहे. मुलीची संमती नसताना तिचा विवाह लावण्यात आला. तिची प्रकृती बरी नसल्यानं सध्या ती अमरावती येथील जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेतत आहे, असं बोंडे म्हणाले.

या तरुणीची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर अनिल बोंडे संवाद साधला. ज्या ठिकाणी तरुणीचा विवाह लावण्यात आला, ती संस्था आणि वकील बोगस आहे, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.

अनिल बोंडेंनी काय दिला इशारा?

या प्रकरणानंतर खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लीम समुदायाला इशारा दिला. "आपली पोरं सांभाळा. जबरदस्तीनं लग्न लावून देत असतील, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत", असा इशारा दिला आहे.

'लव्ह जिहाद' मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर?

लव्ह जिहादचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर आल्याचं दिसत आहे. अनिल बोंडे यांच्यापूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांप्रमाणे लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे भाजप लव्ह जिहादचा मुद्दा भाजपनं अजेंड्यावर घेतल्याचं दिसत आहे.

नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेचा हवाला देत कायद्याची मागणी केली होती. त्याचबरोबर नितेश राणे यांनी लव्ह जिहादसाठी मुस्लीम तरुणांना पैसे दिले जात असल्याचाही आरोप केला होता. नितेश राणेंनी यासाठी रेट कार्ड असल्याचाही दावा विधानसभेत केला होता.

नितेश राणे विधानसभेत म्हणाले होते की, "हिंदू मुलींना पैशांसह आकर्षक भेटवस्तूंचं आमिष दाखवलं जातं. या कामासाठी मुलींनुसार पैसे दिले जातात. याच रेट कार्ड असून, शीख मुलीसाठी ७ लाख, पंजाबी हिंदू मुलीसाठी ६ लाख, गुजराती ब्राह्मण मुलीसाठी ६ लाख, ब्राह्मण मुलीसाठी ५ लाख आणि क्षत्रिय मुलीसाठी ४ लाख रुपये दिले जातात", असा दावा नितेश राणेंनी विधानसभेत केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in