‘कानाखालीच आवाज काढेन’, अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर भडकले
Pune Latest News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दम दिला.
ADVERTISEMENT
Ajit Pawar today news : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांच्या स्पष्ट बोलण्याची नेहमी चर्चा होते. पुण्यातील राष्ट्रवादी काग्रेसच्या बैठकीत अजित पवारांच्या या स्वभावाची प्रचिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आली. बैठकीत बोलताना अजित पवार पदाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.
ADVERTISEMENT
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी सभेसाठी जास्तीत जास्त लोक आणण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले, “पुण्यातून चांगली वाहनं निघाली पाहिजे. 1,000 चारचाकी वाहनं ग्रामीण भागातून आली पाहिजे. शहरी भागातूनही तेवढी वाहनं काढू शकतो. तेवढी आपली ताकद निश्चित आहे. हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या मतदारसंघात आपली ताकद आहे. मी 8 तारखेला येतो. आजची बैठक संपल्यानंतर उद्या, परवा मुंबईत असणार आहे. तोपर्यंत तुम्ही तयारी करा आणि मला दाखवा. मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरही मी बोलू शकेन.”
हेही वाचा >> Cabinet Expansion in Maharashtra : शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?
“सगळ्यांना पदं पक्षामुळे मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे. आपापल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील महिला अध्यक्षांना विचारलं पाहिजे. आज सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुक्यात दौरा असल्यामुळे दत्तात्रय भारणे आणि इतर सहकारी तिकडे असतील”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
Ajit Pawar : “कानाखाली आवाज काढेन आणि राजीनामा घेईन”
अजित पवार बैठकीत बोलताना म्हणाले, “आपल्यावर खूप मोठी मदार आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीच्या सभा मुंबईत घेण्यात आली. नागपूरमध्ये घेण्यात आली. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते आले होते. मुळशीच्या लोकांनीही काम करायचं आहे. जबाबदारीने काम करा, गट बाजी करत बसू नका. नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन, बाकी काही नाही. तुमची बदनामी होत नाही, बदनामी आमची होते. शरद पवारांची बदनामी होते. मी पदाचा राजीनामा घेईन.”
हेही वाचा >> ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव
ADVERTISEMENT
“तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून बसता. तुम्हाला लोकांची कामं करण्यासठी पद दिली आहेत. ही कुठली पद्धत आहे. अलिकडे स्क्रीनशॉट काढले जातात, पार नावाचा सत्यानाश केला आहे. या अशा घटनांमुळे मागच्या कामावर पाणी फेरलं जातं. अशा घटना अजिबात होता कामा नये. त्याबद्दलचा इशारा प्रांत अध्यक्षांच्या साक्षीने देत आहे. यानंतर मी अजिबात कुणाला सांगणार नाही. त्याला मोकळा करेन, जोपर्यंत व्यवस्थित वागत नाही, तोपर्यंत कुठलंही पद देणार नाही”, असा इशारा अजित पवारांनी बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांना दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT