Ravindra Waikar : आमदार वायकर ईडीच्या तावडीतून सुटणार? 'बीएमसी'चा यू-टर्न

दिव्येश सिंह

Ravindra Waikar ED :

ADVERTISEMENT

Ravindra waikar will get relief in ed case
रवींद्र वायकर यांना हॉटेल बांधकाम प्रकरणात मिळू शकतो दिलासा.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकरांना ईडी प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता

point

मुंबई महापालिकेने पुनर्विचार करण्याची दाखवली तयारी

point

सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल

Ravindra Waikar Today News : गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशांच्या फेऱ्यात अडकलेल्या आमदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या प्रकरणामुळे वायकरांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे, त्या प्रकरणात आता बृहन्मुंबई महापालिकेने वेगळी भूमिका घेतली आहे. आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकरांनी नवा प्रस्ताव बीएमसीला दिला असून, महापालिकेने पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन महिन्यातच हे प्रकरण बदललं आहे. (BMC says they are ready to reconsider the proposal  of the petitioner that is Ravindra Waikar)

मुंबई महापालिका हद्दीत असलेल्या जोगेश्वरी येथील आरक्षित जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी हॉटेल उभारले. पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी परवानगी घेत असताना वायकरांनी तथ्ये लपवली आणि खोटे हमीपत्र दाखल केले, असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. 

२०२२ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केल्यापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. 

ईडीकडून धाडी आणि चौकशी

या प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर वायकर यांची चौकशीही ईडीकडून करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp