Ganesh Chaturthi 2024: मुंबईकरांनो... गणपती बाप्पांच्या विसर्जनाला वाहतुकीचे 'हे' नियम पाळा!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यंदा 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी आहे.

point

मुंबईकरांना वाहतुकीचे महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येते.

point

गणेश विसर्जन दरम्यान मुंबईतील ट्रॅफिक नियंत्रणासंबंधित सूचना

Mumbai Ganpati Visarjan Traffic Advisory : यंदा गणेश चतुर्थीच्या सणाला 07 सप्टेंबर 2024 रोजी सुरूवात होणार आहे. तर, 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी आहे. म्हणजेच लाडक्या बाप्पााला निरोप देण्याचा दिवस... दहा दिवस घरोघरी, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला गणेशभक्तांकडून जड अंतःकरणाने अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना वाहतुकीचे महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येते.हे नियम कोणते आहेत? जाणून घेऊया... (Ganesh Chaturthi 2024 Traffic Advisory during Ganpati Visarjan)

ADVERTISEMENT

अनंत चतुर्दशीला 10 दिवसांचा गणपती उत्सव संपतो. हा दिवस तो आहे जेव्हा संपूर्ण भारतातील लोक त्यांच्या आवडत्या गणेशाला निरोप देतात. यावेळी गणेश विसर्जन संदर्भात मुंबई पोलीस वाहतूक निर्बंधांचे तपशील असलेले पत्र जारी करतात. भाविकांना त्रासमुक्त विसर्जन व्हावे यासाठी अधिकारी मुंबईभर वाहनांच्या वाहतुकीत बदल करतात. गणेश विसर्जन प्रसंगी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुम्हीही हे वाहतुकीचे नियम पाळा.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म, लगेच मिळणार 4500 रुपये?

गणेश विसर्जन दरम्यान मुंबईतील ट्रॅफिक नियंत्रणासंबंधित सूचना

  • गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी असते.
  • या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांशी जोडलेल्या वाहनांना सूट देण्यात येते. 
  • यामध्ये दूध, भाजीपाला, भाकरी, पाण्याचे टँकर, सरकारी ड्युटीवर तैनात रुग्णवाहिका आणि स्कूल बस यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यांचा समावेश आहे.
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करा.
  • पश्चिम मुंबईतील गिरगाव, चर्चगेट आणि दादर सारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यकतेशिवाय या भागात जाणे टाळावे.
  • तसेच, गणपती विसर्जन दिवशी कफपरेड आणि बघवार पार्क परीसरातही वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असते. 
  • प्रवाशांना सुचित करण्यात येते की, त्यांनी सदर दिवशी अति महत्वाच्या कामाव्यतिरीक्त सदर परीसरामध्ये प्रवास टाळावा.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT