Ganesh Visarjan 2024: पुढच्या वर्षी लवकर या...! आज गौरी-गणपतीच्या विसर्जनाचा मुहूर्त काय? 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पा घरोघरी वाजत गाजत आले

point

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्थीलाही

point

5 दिवसांच्या गणेश विसर्जनाचा मुहूर्त काय?

Ganesh Visarjan 2024 :  7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पा घरोघरी वाजत गाजत आले देशभर गणेशाच्या उत्सवाचा सोहळा सुरु झाला. अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार 5व्या,7 व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय हे जाणून घेऊयात.  (ganesh visarjan 2024 date correct muhurata what is the muhurat of Ganpati bappas 5th and 7th day)

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्थीलाही आहे. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं विसर्जन 17 सप्टेंबर रोजी आहे. 

हेही वाचा : Crime News: तरुणीचे नग्न फोटो आणि Video व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार

5 दिवसांच्या गणेश विसर्जनाचा मुहूर्त 

  • प्रातः मुहूर्त (शुभ) – सकाळी 10:44 वा. – दुपारी 12:17 वा.
  • अपराह्न मुहूर्त (चर, लाभ) – दुपारी 03:24 वा. – सायंकाळी 06:31 वा.
  • सायाह्न मुहूर्त (शुभ, अमृत, चर ) – रात्री 07:57 – प्रात: 00:18, दि. 12 सप्टेंबर
  • उषाकाल मुहूर्त (लाभ) – सकाळी 03:11 – सकाळी 04:38, दि.12 सप्टेंबर

7 दिवसांच्या गणेश विसर्जनाचा मुहूर्त

  • प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी 06:05 – सकाळी 10:44 वा.
  • अपराह्न मुहूर्त ( चर ) – सायंकाळी 04:55 – सायंकाळी 06:28 वा.
  • अपराह्न मुहूर्त ( शुभ ) – दुपारी 12:17 – दुपारी 01:50 वा.
  • रात्रि मुहूर्त (लाभ ) – रात्री 09:23 – रात्री 10:50 वा.
  • रात्रि मुहूर्त ( शुभ, अमृत, चर ) –  प्रात: 12:17 – सकाळी 04:38, दि. 14 सप्टेंबर
  • अनंत चतुर्दशी पर गणेश विसर्जन मुहूर्त
  • प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी 09:11 वा. – दुपारी 01:47 वा.
  • अपराह्न मुहूर्त (शुभ) -दुपारी 03:19 वा. – सायंकाळी 04:51 वा.
  • सायाह्न मुहूर्त (लाभ) – रात्री 07:51 वा.- रात्री 09:19 वा.
  • रात्रि मुहूर्त (शुभ, अमृत, चर) – रात्री 10:47 वा. – सकाळी 03:12वा., दि. 18 सप्टेंबर

श्री गणेश विसर्जन मंत्र 1

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।

इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

ADVERTISEMENT

श्री गणेश विसर्जन मंत्र 2

ADVERTISEMENT

गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।

मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥

हेही वाचा : Gold Price Today: सोन्याला आली तुफान झळाळी! चांदीचीही चमक प्रचंड वाढली;  पाहा आजचे भाव...

गणेश विसर्जनाची योग्य पद्धत माहितीये का?

  • श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्यानंतर हवन करा आणि नंतर गणेशाचे स्वस्तिवाचन करा.
  • आता पाट घ्या आणि त्यावर स्वस्तिक बनवा. नंतर तो तसाच ठेवावा, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कापड त्यावर पसरून चारही कोपऱ्यात पूजेसाठी सुपारी ठेवावी.
  • आता मूर्ती जिथे ठेवली होती तिथून उचला आणि आनंदाच्या जयघोषात यावर बसवा.
  • आत गणपती बाप्पासमोर फळे, फुले, सुपारी आणि मोदक ठेवा.
  • यानंतर हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करा. पूजेच्या 10 दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागा.
  • आता सर्वांनी गणपती बाप्पाचं नाव घेत बाप्पाला डोक्यावर किंवा खांद्यावर पाटासह विसर्जनस्थळी घेऊन जल्लोषात घरातून निरोप घ्यावा.
  • विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पाची मूर्ती फेकून देऊ नये, तर पूर्ण आदराने विसर्जन करावे. यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी येण्याची विनंती करा. विसर्जनाच्या वेळी कापूर लावून त्याची आरती करावी.
     

    follow whatsapp

    ADVERTISEMENT