अजित पवारांच्या बंडामुळे भाजपच्या स्नेहलता कोल्हेंची का झाली कोंडी?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Ashutosh kale vs snehlata kolhe : political scenario changed in the kopargaon assembly constituency.
Ashutosh kale vs snehlata kolhe : political scenario changed in the kopargaon assembly constituency.
social share
google news

Ajit Pawar : वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली. आता राष्ट्रवादीत फुटली आहे. त्यानंतर घडणाऱ्या घटना पाहता अनेक गोष्टी घडताना दिसतायेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नेते, आमदार दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. त्यातच आधी पवारांना पाठिंबा देणारे काही आमदार आता अजितदादांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भारतात येताच थेट अजित पवारांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. आता काळे यांनी जरी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला असला, तरी तिकडे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांची धाकधूक वाढली आहे. काळेंनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने कोल्हेंची कशी अडचण होऊ शकते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाच्या काळात आशुतोष काळे हे परदेशात होते. परदेशात असताना त्यांनी सुरुवातीला शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलत अजित पवारांना पाठींबा घोषित केला. परदेशातून भारतात येताच काळे यांनी थेट अजितदादांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर दादांसोबतचा फोटो ट्विट केले.

ते म्हणतात, ‘कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला. शरदचंद्रजी पवार आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे’, असं काळे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काळेंमुळे कोल्हेंची कशी होणार अडचण?

आशुतोष काळे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. अवघ्या 822 मतांनी स्नेहलता कोल्हे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. याआधी 2014 साली स्लेहलता यांनी काळेंचा पराभव केला होता. तेव्हा काळे हे शिवसेनेमध्ये होते. 2019 ला चित्र पलटलं आणि काळे अगदी थोड्या फरकाने विजयी झाले.

वाचा >> Seema Haidar : पाकिस्तानी सीमा हैदरने नवऱ्याला सोडले अन् भारताच्या सचिनसोबत…, कहाणी काय?

काळे आता अजित पवारांच्या गटात आहेत आणि हा गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे स्लेहलता यांनी येत्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विखेंच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हेंनी जिंकला. स्नेहलता यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत युती करत विखेंच्या विरोधात पॅनल उभं केलं. 19 पैकी 18 जागांवर कोल्हेंच्या पॅनलने घवघवीत यश मिळवलं. विवेक कोल्हेंनी कोपरगावात वातावरण तयार केलंय. त्याचबरोबर 2019 च्या निसटत्या पराभवाची जखम स्नेहलता कोल्हे यांना भरुन काढायची आहे.

ADVERTISEMENT

कोपरगावची जागा कुणाकडे जाणार?

अशातच आता काळेंनी अजित पवारांना साथ दिल्याने कोल्हेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना आणि अजितदादांच्या गटाने एकत्र निवडणुका लढवल्यास जागांचं वाटप कशा पद्धतीने होईल हा प्रश्न आहे. त्यातच कोपरगावची जागा अजित पवारांच्या गटाला दिली गेल्यास कोल्हेंना याचा फटका बसू शकतो.

ADVERTISEMENT

वाचा >> भरत गोगावलेंचं पालकमंत्रीपद जाणार? आदिती तटकरेंचा वाद अन् अर्थ काय?

स्लेहलता यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र विवेक कोल्हे हे देखील राजकारणात सक्रीय होत आहेत. गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत विवेक यांनी त्यांची ताकद दाखवली होती. त्यातच कोल्हे आणि विखे यांच्यातील वाद देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळे जर भाजपने उमेदवारी नाकारल्यास स्नेहलता काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. याआधीच गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत हात मिळवणी केली होती. त्यामुळे काळे यांच्या अजितदादांना दिलेल्या पाठींब्यामुळे कोपरगावचं राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT