HSC Result 2023: कोकण विभागाने मारली बाजी, कोणता विभाग सगळ्यात तळाशी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra hsc result 2023 konkan division was the top mumbai division was at the bottom
maharashtra hsc result 2023 konkan division was the top mumbai division was at the bottom
social share
google news

Maharashtra HSC Result 2023: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल (Maharashtra board HSC result 2021) आज (25 मे) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजेपासून हे निकाल ऑनलाइन पाहता येणार आहेत. दरम्यान यंदा राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के एवढा लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, कला शाखेचा निकाल 84.05 टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने विभागवार निकालात बाजी मारली आहे. तर मुंबई विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. पाहा महाराष्ट्रातील विभागवार नेमका निकाल कसा आहे. (maharashtra hsc result 2023 konkan division was the top mumbai division was at the bottom)

HSC Result 2023: विभागानुसार निकाल

  1. कोकण – 96.01 टक्के
  2. पुणे – 93.34 टक्के
  3. कोल्हापूर – 93.28 टक्के
  4. अमरावती – 92.75 टक्के
  5. छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
  6. नाशिक – 91.66 टक्के
  7. लातूर – 90.37 टक्के
  8. नागपूर – 90.35 टक्के
  9. मुबंई – 88.13 टक्के

राज्यातील 9 विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. तर यंदा पुणे विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा निकाल 93.34 टक्के एवढा लागला आहे. तर मुबंई विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. ज्यामध्ये फक्त 88.13 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा >> श्रद्धासारखेच हत्याकांड! दगड फोडायच्या मशीनने केले तुकडे अन् फ्रीजमध्ये ठेवले

पाहा 2023 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)

  • कला (Arts) – 84.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते
  • वाणिज्य (Commerce) – 90.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
  • विज्ञान (Science) – 96.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 89.25 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते
  • बारावीचा एकूण निकाल – 91.25 टक्के

कोणकोणत्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल?

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

हे ही वाचा >> CM केजरीवाल पुन्हा ‘मातोश्री’वर; ठाकरेंसमोर मोदींना म्हणाले अहंकारी, स्वार्थी माणूस…

ऑनलाइन निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो रोल नंबर देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना Submit हे बटण दाबावं लागणार आहे.
  • समजा, तुमचा सीट नंबर M758469 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘किर्ती’ असं असेल तर तुम्ही M758469 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच KIR असं टाकावं लागेल.
  • त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT