Vishalgad Encroachment : घर फोडली, वाहनांची तोडफोड आणि धार्मिक स्थळावर दगडफेक...विशाळगडावर प्रचंड तणाव; काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 vishalgadh encroachment houses broken  vehicles vandalized stone pelted religious places sambhaji raje chhatrapati runs saves vishalgad campaign
विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण

point

घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक

point

विशाळगडावर तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली

Vishalgad Encroachment : दिपक सुर्यवंशी, कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. विशाळगडपासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली. या दरम्यान एक घर देखील पेटवण्यात आलं. पोलीसांवर देखील तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता. त्यामुळे आज दिवसभर विशाळगडावर तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.  (vishalgadh encroachment houses broken  vehicles vandalized stone pelted religious places sambhaji raje chhatrapati runs saves vishalgad campaign)

ADVERTISEMENT

 छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला  गेल्या काही वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय. विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळं या ठिकाणी पशुबळी दिले जातात. या गडावरील अतिक्रमणं हटवावीत, अशी आग्रही मागणी करत, माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून, आज त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना, चलो विशाळगड अशी साद घातली होती. 

हे ही वाचा : Exclusive : 'मविआ'च्या बैठकीत उडाले खटके! पवारांचे फोन, ठाकरेंचा 'नो रिस्पॉन्स'

 
 शिववंदन करण्यासाठी आपले कार्यकर्ते विशाळगडावर जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं असलं तरी त्यांचा खरा हेतू हा विशाळगड अतिक्रमण मुक्तीचा होता. आज सकाळी 10 वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन,  संभाजीराजे यांनी विशाळगडाकडं कूच केलं. दरम्यान, विशाळगडाच्या पायथ्याशी संभाजीराजे पोहचण्यापूर्वीच 2 हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला, संभाजीराजे विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचले. मात्र विशाळगडच्या पायथ्या शेजारी असलेल्या गजापूर इथल्या विशिष्ट समाजाच्या वस्तीवर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ले चढवले. यावेळी कार्यकर्त्यांनी विशिष्ट समाजाच्या कुटुंबियांची घरं, दुकानं, वाहनं यांना टार्गेट केलं. सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत, मालमत्तांचं नुकसान केलं. दर्गा, कब्रस्थान, डोली यांची तोडफोड करून 5 ते 6 चारचाकी वाहनं आणि 8 ते 10 दुचाकींचं नुकसान केलं. तर एका घराला आग लावल्यानं, घरातील चार सिलिंडरचा स्फोट होऊन घर आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं.

दुसरीकडं विशाळगडावरील दर्गा परिसरातही कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत घरं, दुकानं आणि धार्मिक स्थळाला लक्ष्य केलं. त्यामध्ये काही तरूण आणि लहान मुलं जखमी झाली होती. कार्यकर्त्यांचा जमाव बेफाम आणि बेकाबू झाला होता. त्यामुळं पोलीसही हतबल झाले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ

दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी जाऊन जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विशाळगड अतिक्रमणमुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला. पण हा आदेश धाब्यावर बसवत, कार्यकर्त्यांनी आज हिंसक आंदोलन केलंच. 

दरम्यान एका कार्यकर्त्यांनं थेट पोलिसावरच तलवारीनं वार केला. यात तो  पोलीस कर्मचारी जखमी झालाय. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, पण त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी संभाजीराजे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यासंबंधी आपण सकारात्मक आहोत, मात्र ज्या गोष्टी न्यायप्रवीष्ठ आहेत, त्याला हात न लावता, इतर अतिक्रमणाबद्दल त्वरित कारवाई करण्यात येईल. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले आहेत. त्यामुळं आपण आक्रमक भूमिका घेऊ नये, असं आवाहन संभाजीराजे यांना करण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT