Exclusive : 'मविआ'च्या बैठकीत उडाले खटके! पवारांचे फोन, ठाकरेंचा 'नो रिस्पॉन्स'

ऋत्विक भालेकर

Vidhan Vidhan Parishad election : ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीच्या 22 मतांनी विजय मिळवला होता, ज्यात काँग्रेसची 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 15 आणि एक अपक्ष आमदार होता. खरं तर काँग्रेसची ही 7 मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीने महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.
maha vikas aghadi meeting clashes between leader udhhav thackeray vijay waddetiwar sharad pawar vidhan parishad election maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट

point

प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल केला

point

ठाकरेंच्या सेनेचा जयंत पाटलांविरोधात कट रचल्याचा आरोप

Vidhan Vidhan Parishad election : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीने महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) हे काँग्रेस आमदारांच्या मतांच्या पाठिंब्याने आरामात विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत.  (maha vikas aghadi meeting clashes between leader udhhav thackeray vijay waddetiwar sharad pawar vidhan parishad election maharashtra politics) 

विधानपरिषद निकालानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीच्या 22 मतांनी विजय मिळवला होता, ज्यात काँग्रेसची 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 15 आणि एक अपक्ष आमदार होता. खरं तर काँग्रेसची ही 7 मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता. त्या आमदारांची मतं फुटण्याची भीती होती. यामध्ये मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटण्याची ठाकरेंना भीती होती. 

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ

राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी आणि कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूपी) नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंना आवश्यक सात मतांचा पाठिंबा देण्याची तयारी होती, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते. ज्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता. 

ठाकरेंचे नेते अनिल देसाई, विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी काँग्रेसने सुरुवातीला दिलेल्या आमदारांच्या पाठिंब्याच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध केला होता.याउलट ठाकरेंच्या सेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या आठ नावांची यादी दिली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp