Ladki Bahin Yojana: वाट पाहुनी जीव शिनला... 'लाडक्या बहिणीं'चे 1500 रुपये कधी होणार जमा?
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची तुफान चर्चा
महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार खात्यात जमा?
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची तुफान चर्चा आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. (when will be mazi ladki bahin yojana 3rd installment in account know the details about it)
ADVERTISEMENT
माहितीनुसार, ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड लिंक झाले आहे. अशा महिलांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे 4500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत.
हेही वाचा : Aishwarya-Abhishek यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा! 17 वर्षांत बदलल्या 'या' गोष्टी, चाहत्यांनी केलं नोटीस
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाहीत. त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत.
हे वाचलं का?
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार खात्यात जमा?
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता, तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत पावसाची उघडीप! 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा; पाहा IMD अलर्ट
अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात पाठविले जातील. असं सूत्रांकडून समजतं आहे. दरम्यान, ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठविले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत मिळतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT