Momos turn deadly : मोमोज खालल्यानंतर महिलेचा मृत्यू, 15 जणांवर उपचार सुरू... नेमका प्रकार काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 हैदराबादमध्ये मोमोज खाल्ल्यानंतर महिला दगावली
हैदराबादमध्ये मोमोज खाल्ल्यानंतर महिला दगावली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोमोज खाण्याचा मोह जीवावर बेतला

point

एका महिलेचा मृत्यू, 15 जणांवर उपचार सुरू

point

कुठे आणि कसा घडला प्रकार? वाचा सविस्तर

Hyderabad MoMOs turn deadly Viral :उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने होणाऱ्या धोक्यांबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. आपल्या प्रियजनांकडून वारंवार बाहेरचं खाणं टाळा असं सागूनही आपल्याला तो मोह आवरत नाही. मात्र असं बाहेरचं अन्न खाणं थेट जीवावर बेतलं तर? हो... तुम्हाला हे खरं वाटत नसलं तरी असं घडलंय. उघड्यावरचे मोमोज् खालल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला असून 15 जणांची प्रकृती बिघडली आहे. (Women dead in Hyderabad after eating momos 15 people hospitalized)

 

हे ही वाचा >>Kitchen Tips: कुकर आणि कढई काळीकुट्ट झालीय? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, भांडी होतील दुधासारखी शुभ्र

 

मागच्या काही दिवसात मोमोज हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड झालं आहे. मात्र आता हैदराबादमध्ये एका रस्त्यावरच्या स्टॉलवरचे मोमोज खाल्यानंतर 15 लोक आजारी पडले असून, एका महिला मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारा हिल्स पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या नंदीनगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात 31 वर्षांच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नंदीनगरमध्ये राहणाऱ्या रेश्मा बेगम यांनी मोमज खाल्ले होते. त्यानंतर त्या आजारी पडल्या आणि रुग्णालयात उपचार करत असताना ही घटना घडली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Ajit Pawar Property : ट्रॅक्टर, ट्रेलर गाडी ते सोनं-चांदी... अब्जाधीश अजितदादांच्या संपत्तीमध्ये काय काय?

 

दिल्ली मोमोज नावाच्या या फूड स्टॉलवर अनेकांनी मोमोज खाल्ले होते. त्यानंतर ते आजारी पडल्याची माहिती आहे. या प्रकरणात इतर 15 जणांवरही उपचार सुरू आहेत. तरी या महिलेचा मृतदेह दफन करण्यात आला असून, मृत्यूचं नेमकं कारण हे चौकशीतच समोर येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, 'दिल्ली मोमोज' स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT