धक्कादायक ! मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन चिमुकल्याचा अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुंबई तक

ADVERTISEMENT

jalana bhokardan mobile blast baby death
jalana bhokardan mobile blast baby death
social share
google news

Jalna News: गौरव साळी/जालना : जालन्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावाजवळील एका वाडीत घडली आहे. 

कुंभारीजवळील वाडीत मृत्यू झालेल्या दुर्देवी घटनेत समर्थ परशुराम तायडे, (वय 6 वर्षे, रा.आमठाणा, ता.सिल्लोड) असं त्या मृत बालकाचे नाव आहे. भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला होता.

हे ही वाचा >> कार्यकर्त्याच्या 'त्या' एका कृतीमुळे मोदी झाले भावूक, जुळ्या बाळांच्या बापासाठी पंतप्रधानांची पोस्ट

हा कार्यक्रम आटोपून 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र त्याआधी एक अशी घटना घडली की, ज्यामुळे तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.कारण 6 वर्षांचा समर्थ हा चार्जिंगला लावलेल्या फोन घेऊन कोणाशी तरी बोलत होता. पण त्याचवेळी त्या मोबाइलमधील बॅटरीचा भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये समर्थ हा गंभीर जखम झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही घटना घडल्यानंतर भोकरदनमधील शासकीय ग्रामीण रूग्णालयात बालकाला दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तायडे कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे समर्थचे वडील हातमजूरी करून मिळेल ते काम करत असतात. त्यातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.  या घटनेची नोंद भोकरदन पोलिसात झाली असून पुढील तपास सपोनि बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 'आम्ही शिवसेना भाजपमध्ये विलीन केलीये का?', कदम भाजपविरोधात आक्रमक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT