तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन मोलकरणींसह तिघे ताब्यात; सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले
Crime News : एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला घरकामगार (मेड) आणि एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र पीडितेच्या पालकांनी थेट सुप्रीम कोर्ट गाठले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर पोलिसांना जाग आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
दोन मोलकरणींसह तिघे ताब्यात
सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले
Crime News : एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मोलकरणी (मेड) आणि एका तरुणाला अटक केली आहे. संगीता (30, रा. एटा, उत्तर प्रदेश) आणि पकीला (32, रा. नदिया, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे असून, तिसरा आरोपी कबीर मुल्ला हा पकीलाचा पती आहे. हे तिघेही गुरुग्राममधील घाटा झोपडपट्टी परिसरात राहतात. धक्कादायक म्हणजे, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर आणि न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी शनिवारी तातडीने ही कारवाई केली. गुरुग्रामच्या सेक्टर-53 मधील ही घटना आहे.
सोसायटीत काम करणाऱ्या महिलांनीच...
या प्रकरणाची पार्श्वभूमी फेब्रुवारी 2026 मधील आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी 4 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या सोसायटीत काम करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांच्या मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत हा घृणास्पद प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र दीर्घकाळ उलटूनही कोणतीही अटक करण्यात आली नव्हती. तपासात समोर आले आहे की, आरोपींपैकी एक महिला पीडितेच्या घरी कामाला होती, तर दुसरी शेजारच्या फ्लॅटमध्ये काम करत होती.
हे ही वाचा : यवतमाळ : 6 वर्षाची मुलगी बेपत्ता, 'एवढ्या' दिवसानंतर पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, गावातील घराची झडती सुरु
पीडितांची सुप्रीम कोर्टात धाव
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पीडित पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीडित मुलीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सविस्तर जबाब नोंदवूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नव्हती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या विशेष खंडपीठाने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्या विनंतीवरून सोमवारी (23 मार्च) सुनावणी निश्चित केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या सक्रियतेमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सुनावणीच्या दोन दिवस आधीच आरोपींना जेरबंद करण्यात आले.










