Ladka Bhau Yojana : दर महिन्याला 10 हजार मिळणार! लाडक्या भावांनो, कसा कराल अर्ज, योजनेच्या अटी काय?
Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana) राज्यातील तरूणांसाठी सूरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडक्या भावांना महिन्याला 10 हजार मिळणार
राज्यातील तरूणांसाठी सरकारने ही योजना आणली आहे
या योजनेत तरूणांना कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
Ladka Bahu Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana) राज्यातील तरूणांसाठी सूरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासोबत सरकार लाडक्या भावांना दर महिन्याला 10 हजार रूपये देणार आहेत. त्यामुळे नेमकी ही योजना काय आहे? या योजनेत अर्ज कसा करायचा? या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत? हे जाणून घेऊयात.
(ladka bhau yojana 2024 youth get benefit of 10 thousand rupees month how to apply for scheme and education qualification details read full article)
राज्यातील बेरोजगार तरूणांना रोजगाराशी जोडण्यासाठी मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. पात्र तरुण विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी कारखान्यात शिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि या अनुभवाच्या जोरावर त्यांना भविष्यात नोकरी मिळू शकेल. या प्रशिक्षणासोबतच राज्यातील बारावी उत्तीर्ण तरुण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये, पदविकाधारकांना 8 हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँकेत 4500 जमा झालेच नाही, 'या' यादीत तुमचं नाव तपासा
योजेनच्या अटी आणि पात्रता
- महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा 12 वी पास असणे गरजेचे आहे. अधिक शिक्षण असलेलेही पात्र ठरू शकतात.
- अर्जदार तरूणास शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसावा.
- अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- निवासी प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला (https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index) रोजगार महास्वयं महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य
होम पेजवर तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
आता तुम्हाला या पेजवर Verify your mobile number च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.
यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
शेवटी तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही यशस्वीपणे नोंदणी करू शकाल.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी खात्यात खटाखट येणार पैसे
नोंदणी केल्यानंतर करायचं का?
नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या लॉगिन तपशीलांसह लॉग इन करावे लागेल.
यशस्वी लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला Click here to apply या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल
या पेजवर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल.
तुम्हाला हा OTP इथे टाकावा लागेल
अशा प्रकारे तुम्ही माझा लाडका भाऊ योजना ऑनलाइन यशस्वीपणे लागू करू शकाल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT