Mazi Ladki Bahin Yojana: महिलांना 'या' दिवशी येणार 4500, पण त्याआधी 'हे' काम विसरू नका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

महिलांना 'या' दिवशी येणार 4500 रुपये
महिलांना 'या' दिवशी येणार 4500 रुपये
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच

point

आधार कार्ड बँक खात्याशी करा लिंक

point

जुलै महिन्यांपासूनचे 4500 रुपये मिळणार

Majhi Ladki Bahin Yojana Installment: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना सरकार दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. योजनेचा पुढचा हप्ता कधी येऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगू. पण त्याआधी महिलांना एक काम आवर्जून करावं लागणार आहे. (mazi ladki bahin yojana installment mazi ladki bahin yojana installment 4500 rupees can come in the account of women of maharashtra by this date linked your aadhaar card with bank account)

ADVERTISEMENT

10 ऑक्टोबरपूर्वी येऊ शकतात खात्यात पैसे 

महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांना मोठी भेट देत माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जाहीर केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे 10 ऑक्टोबरपूर्वीच महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. सरकार महिलांना दिवाळी आणि भाऊबीज भेट म्हणून दोन्ही हप्ते एकत्र पाठवणार आहे. राज्यातील एकूण अडीच कोटींहून अधिक महिलांना या हप्त्यांचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा>> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! टेन्शन घेऊच नका, 'या' तारखेला मिळतील चौथ्या-पाचव्या हफ्त्याचे पैसे

खात्याशी आधार लिंक आवश्यक

महाराष्ट्रात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी योजनेचा पुढील हप्ता जारी होण्यापूर्वी आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केले जाणार नाही. त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Gold Rate: सोन्याच्या किंमतीत मोठी घट! 1 तोळा मिरवून वाढवा आपली वट, पाहा आजचे भाव...

पैसे होऊ शकतात दुप्पट?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा आपले सरकार स्थापन झाले तर त्यांचे सरकार माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत देण्यात येणारी 1500 रुपयांची रक्कम दुप्पट करून 3000 रुपये करेल. म्हणजेच एकनाथ शिंदे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांना दुहेरी लाभ मिळेल.

माझी लाडकी बहीण योजना 

योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

ADVERTISEMENT

किती पैसे मिळणार

दरमहा 1500 रुपये

ADVERTISEMENT

लाभार्थी कोण

महाराष्ट्रातील 18 ते 65 वयोगटातील महिला

कसे मिळणार पैसे

थेट बँक खात्यात होणार जमा

ऑक्टोबर महिन्यात किती पैसे मिळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये

अधिकृत वेबसाइट

ladakibahin.maharashtra.gov.in

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT