Uddhav Thackeray : ठरलं! ठाकरेंचे उमेदवार 'या' चिन्हावर लढवणार लोकसभा

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार?
uddhav Thackeray Shiv Sena Election symbol for Sabha 2024
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना फुट आणि वाद

point

उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची तयारी सुरू

point

मशाल चिन्हावर लढवावी लागणार निवडणूक

Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Symbol : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील कायदेशीर लढाई सुरूच आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार? ठाकरेंचा पक्ष कोणता असणार? हा कळीचा प्रश्न उपस्थित होतोय. पण, याबद्दलचं जाणून घ्या.

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

लोकसभा निवडणूक तोंडावर, सुनावणी लांबणीवर...

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण, अद्यापही त्यावर सुनावणी सुरूच आहे. चिन्ह आणि पक्षाबद्दल हा खटला असल्यानं सुप्रीम कोर्ट लोकसभा निवडणुकी आधीच निर्णय देईल, असं बोललं गेलं. पण, आता सुप्रीम कोर्टानं 19 एप्रिल 2024 ही पुढची तारीख दिली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, पंकजा मुंडेंना उतरवणार मैदानात?

तोपर्यंत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे वेगवेगळ्या टप्प्यातील मतदानही सुरू झालेलं असेल. या सुनावणीतच सुर्वोच्च न्यायालय निकाल देईल, याची शक्यताही कमीच आहे. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार?

ठाकरेंच्या शिवसेनेचे काय असेल चिन्ह?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर रमेश लटके यांचं निधन झालं. त्यावेळी अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यासाठी निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह  आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्ष नाव दिलं होतं. पण, हे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं होतं.

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाने चिन्ह ठेवलं कायम

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर हे प्रकरण पुन्हा कोर्टात गेलं. त्यावेळी ठाकरेंना मशाल हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वापरता येईल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. 

ADVERTISEMENT

आताही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील सुनावणी 19 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लोकसभा निवडणुकीही सुरू झालेली असेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं याआधी दिलेल्या निर्णयानुसार ठाकरेंना मशाल आणि तेच पक्षाचं नाव वापरता येईल.

हेही वाचा >>  40 जागांवर एकमत, महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कुणाला? 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल या चिन्हावरच लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झालंय. वर्षानुवर्ष धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या ठाकरेंना मशाल चिन्हावर किती यश मिळतं हे बघणं महत्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT