MVA Seat Sharing : जागावाटपाच्या बैठकीत पटोले, राऊतांमध्ये खडाजंगी झाली? राऊतांचं उत्तर ऐकाच!
Maharashra Vidhan Sabha मुंबई : महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपासाठी खलबतं सुरू आहेत. काल 29 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची मूदत होती, ती संपल्यानंतरही काही जागांबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मविआचा किती जागांवर अजूनही तिढा?

काँग्रेस आणि शिवसेनेत एकमत नाही?

संजय राऊत नाना पटोलेंमध्ये खडाजंगी?
Maharashra Vidhan Sabha मुंबई : महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपासाठी खलबतं सुरू आहेत. काल 29 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची मूदत होती, ती संपल्यानंतरही काही जागांबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. यानिमित्तानेच आज मुंबई तकने संजय राऊत यांची मुलाखत घेऊन मविआचं नेमकं काय ठरलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत समोर असलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 102 पर्यंत, शिवसेना उद्धव ठाकरे 96 आणि शरद पवार जागा लढणार आहेत. दरम्यान, जागावाटपावरुन सुरू असलेल्या बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Sanjay Raut interview amid mva seat sharing and internal clashes with nana patole)
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेची भूमि्का अशी असते की, 48 मिनिटांत जागा वाटपाचा विषय संपवला पाहिजे, मात्र एखाद्या जागेवरुन चर्चा सुरू असेल तर त्याला वाद समजण्याचं कारण नाही असं राऊत म्हणाले. तसंच सांगली पॅटर्नबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, हा पॅटर्न आता सांगलीत त्यांच्यावरच उलटला आहे विदर्भातल्या जागेवरुन बोलताना राऊतांनी सांगितलं की, रामटेकची जागा आम्ही जिंकत आलोय असं राऊतांनी सांगितलं. तसंच बैठकीत झालेली चर्चा ही खडाजंगी नसून, गमतीने झाल्याचंही ते म्हणाले.
हे ही वाचा >>Raj Thackeray : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, राणेंचं नाव घेत 'तो' किस्सा सांगितला
काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, दिल्लीत त्यांची कित्येक वर्ष सत्ता होती, त्यांनी देशाला 5-6 पंतप्रधान दिलेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने प्रादेशिक पक्षांना सांभाळून घेतलं पाहिज. भाजपने जसे लहान पक्ष संपवण्याचे काम केलं, तसं काँग्रेसने करू नये असं म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच प्रादेशिक पक्षांवर अन्याय केल्यास राष्ट्रीय पातळीवर असंतुलन निर्माण होईल असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला.
लोकसभेप्रमाणे आता विधानसभेतही शिवसेनेने काँग्रेसला कमी जागा देत आपल्याला जास्त जागा घेण्याची भूमिका मांडली, याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्याचं उत्तर दिलं. ते म्हणाले की, लोकसभेला आम्ही आमच्या तीन जागा त्यांना दिल्या, कारण कोल्हापूरसारख्या ठिकाणी शाहू महाराज असल्यानं आम्हाला वाटलं विरोध नको. एकूणच लोकसभेतील विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला.