स्मृती इराणींच्या कार ताफ्यावर राष्ट्रवादीच्या विशाखा गायकवाडांकडून अंडी फेकण्याचा प्रयत्न

मुंबई तक

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी पुणे दौर्‍यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. तर त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना,त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी पुणे दौर्‍यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. तर त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना,त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा! भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीने केला मारहाणीचा आरोप

भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आज पुण्यात दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्मृती इराणी पुण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळताच, त्यांनी आज दुपारी चार वाजता सेनापती बापट रोडवरील एका हॉटेलमध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना बाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं.

एवढंच नाही तर स्मृती इराणी जिथे थांबल्या होत्या तिथल्या हॉटेल मध्ये आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये घुसून स्मृती इराणी यांना निवेदन देणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र आक्रमक कार्यकर्ते लक्षात घेता,त्या सर्वांना काही आतमध्ये प्रवेश दिला नाही आणि त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे वाचलं का?