Mumbaitak Baithak 2024: अजित पवारांची राष्ट्रवादी का हरली? प्रफुल पटेलांनी सांगितली तीन कारणे
Praful Patel at Mumbaitak Baithak 2024: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत किती जागा मिळणार?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबई Tak बैठकमध्ये प्रफुल पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची रणनीती
राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा का जिंकता आली?
लोकसभा निवडणुकीत कोणत्या चुका झाल्या?
Praful Patel Mumbaitak Baithak 2024: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फारसा प्रभाव पाडू शकली नाही. चारपैकी एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकता आली. या निकालातून धडा घेत अजित पवारांनी यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेसाठी रणनीती काय आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार आहेत, याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात भाष्य केले. (Why Ajit Pawar's NCP Defeats in Lok Sabha election 2024)
प्रफुल पटेल म्हणाले की, "लोकसभेला संविधान बदलण्याचे नरेटिव्ह होते. ते नरेटिव्ह ४०० पारच्या नाऱ्यामुळे पसरलं. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर संविधान बदलण्याचा होता. तो विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही."
हेही वाचा >> लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी, नाहीतर अर्ज होणार बाद!
"शेतकरी फॅक्टर लोकसभेला होता. ती खबरदारी सरकारने घेतली आहे. वीज बिल माफ झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची नाराजी होती. पण, आता त्याबद्दल गोष्टी केल्या गेल्या", असे प्रफुल पटेल म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> '...तर ते मी खपवून घेणार नाही', ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला, राज ठाकरेंचा इशारा
"महाराष्ट्रात तीन फॅक्टरचा लोकसभा निवडणुकीत फटका बसला. यात सामाजिक, शेतकरी आणि नरेटिव्ह हे फॅक्टर होते. शेतमालाला चांगला भाव यावेळी मिळाला नाही. कांद्याचा प्रश्न होता. सामाजिक फॅक्टर होते, त्याचा फटका बसला", असे पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ दोन उमेदवार होते - पटेल
प्रफुल पटेल म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी आम्ही समजूदारपणा दाखवला. धाराशिवची जागा आम्हाला ऐनवेळी दिली गेली. महत्त्वाचे म्हणजे चारपैकी दोनच उमेदवार मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. महत्त्वाचे म्हणजे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होता", असे पटेल यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT