अभिमानास्पद! Global Teacher डिसले गुरूजींची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Global Teacher हा बहुमान मिळवणाऱ्या डिसले गुरूजी यांची आता जागतिक बँकेने सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर, बार्शी या ठिकाणी राहणारे रणजीत सिंह डिसले यांनी ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. आता त्यांची नियुक्ती जागतिक बँकेने सल्लागारपदी केली आहे. त्यामुळे डिसले गुरूजींवर राज्यभरातून अभिनंदनाचा वारंवार होतो आहे.

डिसले गुरूजी हे जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांच्या अंतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील शाळेत रणजीतसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या मदतीने शिकवण्यासाठी डिसले गुरूजी प्रसिद्ध आहेत. त्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. तसेच इतर शाळांनी टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरित केलं आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी छोटेखानी प्रयोगशाळाही उभारली आहे त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना शिकवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहेत डिसले गुरूजी?

ADVERTISEMENT

डिसले गुरूजी हे ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

ADVERTISEMENT

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार विजेते आहेत

सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना सात कोटी रूपयांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या संदर्भातली घोषणा केली होती

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचं रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे

या रकमेतून नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जाईल असा त्यांचा मानस आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT