13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतीलच अधीक्षकाने केले दुष्कृत्य; सर्वत्र संताप
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज-तांडा येथील आश्रमशाळेच्या अधिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या खाजगी आश्रमशाळेच्या अधिक्षकाने इयत्ता आठवीच्या वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर येताच पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निवासी आश्रम शाळेतील मुलांचे देखभाल करणाऱ्या अधीक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने त्याच्यावर […]
ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या बरांज-तांडा येथील आश्रमशाळेच्या अधिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या खाजगी आश्रमशाळेच्या अधिक्षकाने इयत्ता आठवीच्या वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर येताच पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निवासी आश्रम शाळेतील मुलांचे देखभाल करणाऱ्या अधीक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समोर येत आहे.
नेमकं हे प्रकरण उघडकीस कसे आले?
याबाबत अधिक वृत्त असे की, पिढीत मुलगी महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून या आश्रमशाळेत शिकायला आली होती. पहिली ते दहावी वर्ग असलेली या निवासी आश्रमशाळेत 360 मुले तर 120 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मागील काही दिवसांपासून संबंधित मुलीला त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने तिच्या पालकांनी 4 ऑगस्टला तिला घरी परत नेले. दरम्यान पालकांनी विश्वासात घेतल्यावर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगितला.
पालकांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल