चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात ACB कडून गुन्हा दाखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहेत. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्या पतीला कोणतीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. हा सगळा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर […]
ADVERTISEMENT

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहेत. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्या पतीला कोणतीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. हा सगळा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा तपास सुरू होता. त्यामुळे आता जी माहिती समोर आली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं एसीबीने सांगितलं आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही असंही एसीबीने म्हटलं आहे.
काय आहे सचिन सावंत यांचं ट्विट?