महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारांहून अधिक Corona रूग्ण पॉझिटिव्ह, 51 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजार 286 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 933 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 63 लाख 57 हजार 12 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजार 286 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 933 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 63 लाख 57 हजार 12 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.23 टक्के इतके झाले आहेत.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 78 लाख 19 हजार 385 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 37 हजार 843 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 58 हजार 653 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 38 हजार 491 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3286 नवीन रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 37 हजार 843 एवढी झाली आहे.
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय
हे वाचलं का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागाने यासंबंधी नियोजन केलं होतं. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. तर शहरी भागात आठवी ते १२वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय
ADVERTISEMENT
राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT