‘तुमची पोरं सांभाळा नाहीतर…’; भाजप खासदार अनिल बोंडेंचा मुस्लीम समुदायाला इशारा, काय आहे प्रकरण?
भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी लव्ह जिहादसंदर्भाने धक्कादायक आरोप केला आहे. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुस्लीम मुलाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने विवाह केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहेत. अनिल बोंडे यांनी थेट मुस्लीम समुदायाला इशाराही दिला. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती येथील रुग्णालयात जाऊन संबंधित तरुणीची भेट घेतली. या […]
ADVERTISEMENT

भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी लव्ह जिहादसंदर्भाने धक्कादायक आरोप केला आहे. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुस्लीम मुलाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने विवाह केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहेत. अनिल बोंडे यांनी थेट मुस्लीम समुदायाला इशाराही दिला.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती येथील रुग्णालयात जाऊन संबंधित तरुणीची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार अनिल बोंडे यांनी हिंदू मुलीशी बळजबरी विवाह केल्याचा आरोप केला आहे.
अमरावतीत लव्ह जिहादची घटना?; अनिल बोंडेंचा आरोप काय?
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे, नववीपर्यंत शिक्षण झालेल्या एका मुस्लीम तरुणाने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीशी जबरदस्तीने विवाह केला आहे. मुलीची संमती नसताना तिचा विवाह लावण्यात आला. तिची प्रकृती बरी नसल्यानं सध्या ती अमरावती येथील जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेतत आहे, असं बोंडे म्हणाले.
या तरुणीची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर अनिल बोंडे संवाद साधला. ज्या ठिकाणी तरुणीचा विवाह लावण्यात आला, ती संस्था आणि वकील बोगस आहे, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.