उस्मानाबाद : नवरात्र उत्सवात भक्तांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाहीच, सर्व धार्मिक विधी पंरपरेनुसार होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्तांविना साजरा होणार होणार असून नवरात्र काळात उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे. नवरात्र काळात भक्तांना प्रवेश नसला तरी देवीच्या सर्व धार्मिक विधी अलंकार पूजा या विधीवत होणार आहेत.

ADVERTISEMENT

तुळजाभवानी मंदिरात केवळ 50 जणांना धार्मिक विधीसाठी मिळणार प्रवेश असुन लसीकरण केलेलं असेल तरच संबंधित पुजाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक व पुजारी मंडळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवरात्र उत्सवात देवीचे महंत, सेवेकरी, पुजारी व इतर मानकरी यांनाच प्रवेश मिळणार आहे. कोविडची परिस्थिती लक्षात घेता सरकारी नियमानुसार तुळजाभवानी देवीच्या सर्व पूजा, अलंकार व विधी होणार आहेत. नवरात्र काळात भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रवेश बंदी असणार तसेच तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेशावर पोलीस बंदोबस्त असणार आहे.

नवरात्र काळात अनेक भाविक मशाल घेऊन व पायी चालत दर्शनासाठी येतात मात्र त्यांना प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे भाविकांनी तुळजापूर शहरात येऊ नये व ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी केले आहे.

हे वाचलं का?

महाराष्टाची कुलस्वामिनी व साडे तीन शक्तीपीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार आहे. मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे, हा उत्सव 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. त्यानुसार नगर परिषद प्रशासन शहरात स्वच्छता , बॅरिगेटिंग व कोरोना अनुषंगाने फवारणी करनार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचीन रोचकरी यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT