फडणवीस-शाहांच्या भेटीत पवारांची एंट्री, Nawab Malik म्हणतात हा BJP IT Cell चा फर्जीवाड़ा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी वर्षात मार्च महिन्यामध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य केलं आणि राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतल्यामुळे या चर्चा आणखीनच वाढल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत सत्ताबदलाची शक्यता फेटाळून लावली आहे.

ADVERTISEMENT

परंतू मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना टोला लगावला आहे.

नवाब मलिकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अमित शाहा-देवेंद्र फडणवीस भेटीत शरद पवार बसल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. नवाब मलिकांनी हा फोटो BJP च्या IT Cell ने क्रॉप करुन व्हायरल केल्याचा आरोप करत याच फोटोच्या आधारावर केंद्रीय मंत्री मार्चमध्ये सरकार बनवण्याचा दावा करत आहेत का असा प्रश्न विचारला आहे.

हे वाचलं का?

याचदरम्यान नवाब मलिकांनी शरद पवारांचा मुळ फोटो जोडत IT cell चा फर्जीवाडा समोर आणला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते सगळं काही ठीक होईल असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये नारायण राणे बोलत होते.

ADVERTISEMENT

राणेंवर नवाब मलिकांची बोचरी टीका –

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे .

23 वर्षांपूर्वी नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या आणि बोकडांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतं आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आमचे महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर 25 वर्षांसाठी टिकेल असे जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यापासून हे सरकार पडेल अशा वल्गना केल्या जात आहेत. नारायण राणे जे काही बोलले त्याला काही अर्थ नाही. त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली म्हणून ते बोलत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT