स्मृती इराणींच्या कार ताफ्यावर राष्ट्रवादीच्या विशाखा गायकवाडांकडून अंडी फेकण्याचा प्रयत्न
भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी पुणे दौर्यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. तर त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना,त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. […]
ADVERTISEMENT

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी पुणे दौर्यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. तर त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना,त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा! भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीने केला मारहाणीचा आरोप
भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आज पुण्यात दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्मृती इराणी पुण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळताच, त्यांनी आज दुपारी चार वाजता सेनापती बापट रोडवरील एका हॉटेलमध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना बाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं.
एवढंच नाही तर स्मृती इराणी जिथे थांबल्या होत्या तिथल्या हॉटेल मध्ये आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये घुसून स्मृती इराणी यांना निवेदन देणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र आक्रमक कार्यकर्ते लक्षात घेता,त्या सर्वांना काही आतमध्ये प्रवेश दिला नाही आणि त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथील अमित शाह आणि भाजपची वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्यास स्मृती इराणी हॉटेलमधून रवाना झाल्या. त्यांच्या जाणार्या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये हे लक्षात घेता, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. एवढ्या चोख पोलीस बंदोबस्त मध्ये कार्यक्रम सुरू झाला. पण बालगंधर्व रंगमंदिर येथील बाल्कनीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या वैशाली नागवडे या तीन महिलांसह आल्या. तेवढय़ात तेथील कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती पोलिसाना दिला.त्यानंतर कार्यक्रमामध्ये गोंधळ होऊ नये, म्हणून वैशाली नागवडे यांच्या सोबत आलेल्या तीन महिलांना बाहेर काढत असताना. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.तेवढय़ात त्यांच्यातील भस्समराज तिकोणे यांनी दोन महिला पदाधिकाऱ्यांना झापड मारली. वैशाली नागवडे यांच्या कानाखाली मारली. या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वांनी डेक्कन पोलिस स्टेशनकडे धाव घेत, मारहाण करणार्या व्यक्तीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी करीत रस्त्यावर आंदोलन केले.ही घटना थांबत नाही.
बालगंधर्व रंगमंदिर येथील स्मृती इराणी यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांनी अंडे फेकण्याचा प्रयत्न केला.यानंतर पोलिसांनी विशाखा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाला पोलिसानी ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.